शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी

By पूनम अपराज | Published: September 28, 2020 5:56 PM

1 / 5
यात धनबाद तसेच बोकारो आणि रांची येथील मुलींचा समावेश आहे. याप्रकरणी धनबाद येथील एका मुलीने सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या लबाडीने मुलींसह आतापर्यंत 6.30 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. (Pic - Aaj Tak)
2 / 5
आशिष नावाच्या युवकाने सांगितले की, पार्वतीसह प्रियंका, लिसा, मुस्कान, मल्लिकासह सर्व मुलींना एअर होस्टेसची नोकरी देण्याबाबत बतावणी केली. ठगाने मुलींना अनेक प्रकारची कागदपत्रेही दाखविली, ज्यामुळे मुलींचा त्यांचावर विश्वास बसला. पहिल्या नोंदणीच्या नावाखाली तीन हजार रुपये घेतले. यानंतर त्याने इतर कागदपत्रे तयार करण्यासाठी पाच हजार रुपये मागितले. नंतर त्याच्याकडून पैशांची मागणी सतत वाढत गेली. (Pic. Aaj Tak)
3 / 5
दरम्यान, आशिष मोदी या आरोपीने या सर्व मुलींना सांगितले की, नोकरीबाबत मुलाखत रांची विमानतळावर घेतला जाईल. मग सर्व मुलींकडून आणखी 15000 रुपये उकलण्यात आले. एकूणच आशिषने प्रत्येक मुलीकडून 30-30 हजार रुपये वसूल केले. त्यांनी मुलाखतीसाठी बोगस पत्रही पाठविले.
4 / 5
वेळापत्रकानुसार जेव्हा मुलाखती देण्यासाठी मुली रांची विमानतळावर पोहोचल्या, तेव्हा त्यांना या घोटाळ्याची माहिती उघड झाली. तेथील विमानतळ अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही मुलाखत घेण्यास नकार दिला. नंतर, मुलींनी आशिष मोदीकडे पैसे परत मागितले असता त्याने अश्लील साइटवर या सर्वांची छायाचित्रे टाकण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली.
5 / 5
फसवणूकीला बळी पडल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आशिष मोदी अटक करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. हा ठग लवकरात लवकर पकडला जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. (Pic - Aaj Tak)
टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसJharkhandझारखंड