शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकाच गावातील २५०० लोक सेक्सटॉर्शनमध्ये; पुण्यातील युवकांच्या आत्महत्येचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 8:09 PM

1 / 10
मागील महिन्यात पुण्यातील एका बातमीने खळबळ उडाली होती. शहरात एका तरुणाला त्याचे नग्न छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्याला घाबरून २ वर्षीय तरुणांनी आत्महत्या केली होती.
2 / 10
या दोन तरुणांना सातत्याने धमकावले जात होते. त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. बदनामीच्या भीतीने त्यांना ब्लॅकमेलिंग होत राहिले, मात्र वसुलीची मागणी पूर्ण करणे कठीण झाल्याने अखेर दोन्ही तरुणांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं.
3 / 10
या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना या प्रकरणाची राजस्थानमधील लिंक सापडली आहे. पुणे पोलिसांनी वसुली करणाऱ्या कॉल नंबरचे लोकेशन ट्रेस केले. माहिती मिळताच पोलीस अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगढच्या गोथरी गुरु गावात पोहोचले तेव्हा येथे २५०० लोक सेक्सटॉर्शनमध्ये सहभागी असल्याचं आढळलं.
4 / 10
धक्कादायक बाब म्हणजे या सेक्सटॉर्शन रॅकेटमध्ये केवळ गावातील पुरुषच नाही तर महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. म्हणजेच संपूर्ण गाव मिळून तरुणांना देहविक्रीच्या जाळ्यात अडकवण्याचा धंदा करत आहे.
5 / 10
या प्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधील गोथरी गुरु गावात अन्वर सुबान खान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. देहविक्रीच्या खंडणीला कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली होती. या दोघांच्या आत्महत्येचे कारण पोलिसांनी शोधून काढलं.
6 / 10
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून हे सेक्सटॉर्शन रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. अटक आरोपी अन्वर खान याच्या चौकशीत सर्व माहिती समोर आली आहे. आरोपी गावात असल्याची पुणे पोलिसांना माहिती मिळताच त्या गावात दाखल झाले.
7 / 10
मात्र आरोपी अन्वरला पकडल्यानंतर घेऊन जात असताना गावातील लोकांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. असे करून ते आरोपीला सोडविण्याचा प्रयत्न करत होते. कसेबसे पोलीस आरोपीसह गावाबाहेर आले.
8 / 10
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून मिळालेली माहिती धक्कादायक होती. आरोपी अन्वर खान याने उघड केले की, या देहविक्री रॅकेटमध्ये त्याच्या गावातील महिला आणि पुरुषांसह सुमारे २५०० लोक सामील आहेत.
9 / 10
सेक्सटॉर्शन करण्यासाठी आधी बनावट सोशल मीडिया अकाउंट बनवले जाते आणि रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या महिलेशी फोनवर बोलण्याचे आमिष दाखवले जाते. यानंतर, व्हिडिओ कॉल करून जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला फोटो शेअर करण्यास सांगितले जाते.
10 / 10
हे फोटो मॉर्फ करून टार्गेट केलेल्या व्यक्तीला आक्षेपार्ह अवस्थेत दाखवले जाते आणि नंतर फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात. या संपूर्ण रॅकेटमध्ये गोथरु गुरू गावातील महिला व पुरुषांचा समावेश असल्याने पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहेत.
टॅग्स :Policeपोलिस