शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३ हजारांची पैज! नवऱ्याने पाहुण्यांसमोर 'असं' काही केले ज्यानं नवरी संतापली, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 4:15 PM

1 / 10
उत्तर प्रदेशातील संभल भागात लग्नमंडपात नवऱ्यानं केलेल्या एका कृत्यामुळे नाराज झालेल्या नवरीनं लग्नापासून नकार दिला. नवरदेव आणि त्याच्या घरच्या मंडळींनी तिला लग्नासाठी विनवणी केली परंतु नवरीने तिचा हट्ट सोडला नाही.
2 / 10
नवरीने घेतलेल्या भूमिकेमुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. त्याठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कुटुंबीयांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. अखेर नवऱ्याला नवरीला न घेताच पुन्हा माघारी परतावं लागलं.
3 / 10
बदायूमध्ये २६ नोव्हेंबरला सामुहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केले होते. त्यात एक युवक-युवती विवाहाच्या बंधनात अडकले होते. एकदा लग्न झाल्यानंतरही नवऱ्याकडची मंडळी पारंपारिक पद्धतीने वऱ्हाड घेऊन नवरीच्या गावी पोहचले.
4 / 10
वऱ्हाड आले, मंडपात नवरदेव स्टेजवर पोहचला. काही वेळात तिथे नवरी आली. या दोघांच्या लग्नविधी सुरू होत्या. दोघांनी एकमेकांना हार घातले. पण त्याचवेळी नवऱ्याने थेट नवरीचं चुंबन घेतले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नवरी हैराण झाली.
5 / 10
मात्र काही क्षणात तिचा राग अनावर झाला. ती संतापाने विधी सोडून स्टेजवरून खाली उतरली. त्यानंतर या मुलाशी लग्न करणार नाही असा पवित्रा तिने घेत लग्नास नकार दिला. वऱ्हाडात आलेल्या ३०० लोकांसमोर असे कृत्य करणाऱ्यासोबत राहू शकत नाही असं मुलीने सांगितले.
6 / 10
दुसरीकडे नवऱ्याने दावा केला की, नवरीने स्वत: माझ्याशी पैज लावली होती. मी तिला सगळ्यांसमोर किस करावी अशी पैज नवरीने लावली होती. जर मी असे केले तर ती मला १५०० रुपये देणार होती आणि मी पैज हरलो तर तिला ३ हजार द्यायचे होते असं त्याने म्हटलं.
7 / 10
जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा नवरीने केलेले कृत्य पाहून नवऱ्याला धक्का बसला. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. तिथे पोलिसांनी याबाबत नवरीला विचारलं तेव्हा मी असे काही सांगितलेच नाही, मी कुठलीही पैज लावली नाही असं नवरी म्हणाली.
8 / 10
पवासा येथील युवतीचे लग्न बदायू येथील युवकाशी ठरलं होतं. या दोघांनी बदायू येथे सामुहिक विवाह सोहळ्यात लग्न केले. त्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने पुन्हा एकदा लग्न करण्याचं ठरवलं. सोमवारी नवरदेव वऱ्हाडाला घेऊन नवरीच्या गावी पोहचला होता.
9 / 10
लग्नाच्या विधी सुरु होत्या. हार घालताना नवऱ्याने नवरीला किस केले. यावरूनच वाद पेटला. नवरीने या गोष्टीचा उल्लेख करत लग्नाला नकार दिला. दोन्हीकडच्या नातेवाईकांनी मुलीचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु मुलगी लग्न न करण्यावर ठाम राहिली.
10 / 10
नवरीच्या या निर्णयामुळे लग्नमंडपात भयाण शांतता पसरली. नवऱ्याकडचे नवरीला विनवणी करू लागले. परंतु तिने हट्ट सोडला नाही. गावची पंचायत बसली तिथेही मुलीने लग्नास ठाम नकार दिला. मी या मुलाशी लग्न करणार नाही असे तिने सगळ्यांना बजावलं.