शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कंडोममध्ये ५० लाखांचं सोनं घालून प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं; NCB चे अधिकारी झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 6:52 PM

1 / 11
भारतात होणारी अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी एनसीबीने कंबर कसली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तस्करीच्या नानाविध शक्कल लढवून सोनं, अमली पदार्थ आदींची तस्करी केली जात आहे.
2 / 11
१७ ऑगस्टला एनसीबीने मुंबई विमानतळावरुन तीन महिलांना अटक केली आहे. या महिलांनी सोनं तस्करीसाठी ज्या पद्धतीचा वापर केला होता, त्या शक्कलेने NCB चे अधिकारीही हैराण झाले.
3 / 11
मोहमुद खुरेशा अली (वय 61 वर्षे), अब्दुल्लाही अब्दिया अदान (वय 43 वर्षे), अली सादिया अल्लो (वय 45 वर्षे) अशी या महिलांची नावे आहेत. या तिघी देखील केनियाच्या नागरिक आहेत. या तिन्ही महिलांनी चक्क कंडोमचा वापर करून सोनीचीची तस्करी केली.
4 / 11
या तिन्ही महिला दोहा येथून मुंबईत आल्या होत्या. त्यांनी सोनं पॅकिंगसाठी कंडोमचा वापर केला. तसेच गुप्तांगात ५० लाखांचं सोनं या तिन्ही महिलांनी लपवलं होतं
5 / 11
एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला पँटमध्ये ड्रग्ज लपवून आणत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. मात्र स्कॅनिंगमध्ये ड्रग्ज ऐवजी सोनं आढळून आलं.
6 / 11
विमानतळावर स्कॅनिंगदरम्यान महिलांच्या पोटातून तब्बल ५० लाखांहून अधिक किमतीचे सोनं सापडलं आहे.
7 / 11
या महिलांनी काँडममध्ये सोनं भरून गुप्तांगामध्ये सोनं लपवलं होतं. यातून तब्बल 937.78 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. जप्त केलेल्या १३ पॅकेट्समध्ये १७ सोन्याचे भाग सापडले आहेत.
8 / 11
या महिला केनियातील नागरिक असून त्या केनियाहून कतारला गेल्या आणि त्यानंतर दोहा येथून त्या मुंबईला आल्या होत्या. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही एनसीबीने कारवाई केली.
9 / 11
मात्र, ड्रग्स आढळून न आल्याने सोन्याची तस्करी करणाऱ्या त्या तीन महिलांना एनसीबीने कस्टम्सकडे सोपवलं आहे.
10 / 11
विमानतळावर या तिन्ही महिलांना ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरु केली. तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांना सर जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
11 / 11
अजूनही या महिलांना वैद्यकीय निगराणीखाली जे जे रुग्णालयात ठेवण्यात आलं असल्याची माहिती दिली.
टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोAirportविमानतळkenyaकेनियाMumbaiमुंबईGoldसोनंSmugglingतस्करी