800 years old mughal period coins found in kaushambi two person arrested
खोदकामात २ युवकांना सापडला ८०० वर्ष जुना खजिना; बाजारात विकायला गेले अन्.... By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 1:18 PM1 / 10उत्तर प्रदेशातील कौशांबी पोलिसांनी मुगलकालीन सिक्के मिळाल्यानंतर ते विकायला गेलेल्या २ युवकांना पोलिसांनी अटक केली आहे.2 / 10कौशांबीच्या भौतर गावात मुकेश पुरी नावाचे इसमाच्या घराचं बांधकाम सुरु होतं. घराचा पाया खोदताना त्यावेळी जमिनीत ८०० वर्ष जुना खजिना दोन मजुरांच्या हाती लागला. 3 / 10हा खजिना म्हणजे मुगलकालीन सिक्के होते, मुकेश पुरी यांनी हे सिक्के विकायला अझुवा बाजारात गेले. त्याठिकाणी सराफा व्यापारी अर्जुन सोनी यांना ते सिक्के दाखवले4 / 10अर्जुन सोनी यांनी सिक्के पाहून भरवारी कस्बे याठिकाणी व्यापारी याची जास्त किंमत देतील असं सांगितले. त्यानंतर दोघं जण १७१ मुगलकालीन सिक्के विकण्यासाठी भरवारी बाजारात गेले होते. 5 / 10दरम्यानच्या काळात जेव्हा लोकांना याची भनक लागली. त्यातील काहींनी याची माहिती थेट पोलिसांना दिली. कोखराज ठाण्यातील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 6 / 10पोलीस आणि एसओजीच्या टीमने ८०० वर्ष जुने मुगलकालीन सिक्के विकणाऱ्या तरुणांना अटक करुन सिक्के ताब्यात घेतले. 7 / 10अटक केल्यानंतर आरोपींनी पोलिसांनी सांगितले की, मुगलकालीन सिक्के घराचं बांधकाम करताना खोदकामावेळी सापडले, सिक्के ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी ते पुरातत्व विभागाकडे परीक्षणासाठी पाठवले आहेत.8 / 10पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करुन जेलमध्ये पाठवले आहे. या सिक्क्यांबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक अशोक कुमार यांनी सांगितले की, या दोघांकडून १७१ मुगलकालीन सिक्के जमा केले आहेत. 9 / 10या सिक्क्यांचे वजन ६ ग्रॅम आहे, हे विकण्याच्या तयारीत असताना यांना पकडलं आहे. पुरातत्व विभागाकडून या सिक्क्याचं परीक्षण होईल त्यानंतर याची खरी किंमत काय आहे याची माहिती मिळेल असं पोलिसांनी सांगितले आहे. 10 / 10पण पैशाच्या लालसापोटी या तरुणांना ऐतिहासिक खजिना विकणं महागात पडलं आणि जेलची हवा खावी लागली. आणखी वाचा Subscribe to Notifications