शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हातात बंदूक, अनेक पिस्तुलं आणि समोर काडतुसांचा ढिग, मूसेवालाला मारणाऱ्या शूटरचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 19:52 IST

1 / 7
पोलिसांनी अंकित सिरसाला दिल्लीतील कश्मीरी गेट परिसरातून पकडले. अंकित सिरसासोबत त्याचा साथीदार सचिन भिवानी यालाही पोलिसांनी पकडले आहे. या दोघांकडून पंजाब पोलिसांच्या तीन गणवेशांव्यतिरिक्त दोन मोबाइल संच, डोंगलसह दोन पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत.
2 / 7
पोलिसांनी सांगितले की, 9वी पास अंकित सिरसा चार महिन्यांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सामील झाला होता आणि त्याने सिद्धू मूसवालाचा पहिला खून केला होता.
3 / 7
स्पेशल सेलचे प्रमुख एचजीएस धालीवाल यांनी सांगितले की, 29 मे रोजी मुसेवाला यांच्या हत्येनंतर अनेक पोलिस पथके कामाला लागली होती. या हत्याकांडाचा मास्टरमाइंड समजल्यानंतर शूटर्सना पकडण्याचे पोलिसांचे टार्गेट होते.
4 / 7
प्रियव्रत फौजीसह पहिल्या तीन शूटर्सला अटक करण्यात आली. इतर आरोपींसाठी आमची पथके सहा राज्यांत रवाना झाली. उर्वरित शूटर दीपक मुंडे, मनप्रीत मन्नू आणि जगप्रीत रूपा अद्याप फरार आहेत.
5 / 7
दरम्यान, अंकित सिरसाला रविवारी रात्री 11.15 वाजता दिल्लीच्या कश्मिरे गेट येथून पकडण्यात आले. सिद्धू मुसेवाला यांच्या जवळ गेल्यानंतर अंकितने दोन्ही गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी त्याचा साथीदार सचिन भिवानी यालाही पकडण्यात आले आहे.
6 / 7
दुसरीकडे, यापूर्वी अटक करण्यात आलेले शुटर प्रियव्रत फौजी, केशव, कशिश आणि दीपक यांची कोठडी संपली आहे. यापैकी तिघांना पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. प्रियव्रत उर्फ ​​फौजीची ओळख परेड व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. 14 दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला कोर्टात हजर केले. पंजाब पोलिसांनी या सर्वांसाठी अटक वॉरंट आणले आहे. आता पंजाब पोलीस ट्रान्झिट रिमांडची मागणी करणार आहेत.
7 / 7
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात 29 मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रार आणि दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंदिस्त असलेला लॉरेन्स बिश्नोई यांनी या हत्याकांडाची जबाबदारी घेतली.
टॅग्स :Firingगोळीबारdelhiदिल्लीPoliceपोलिसPunjabपंजाबArrestअटक