शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३ आठवड्यातच 'तिने' सर्वस्व गमावलं; डोळे झाकून विश्वास ठेवणं महिलेला महागात पडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 5:52 PM

1 / 10
मी इतकी मूर्ख कशी असू शकते? विश्वास बसत नाही की मीदेखील त्या महिलांमधील एक आहे ज्यांच्याबाबत नेहमी मॅगजिनमध्ये वाचलं जातं. तो मला टिंडरवर भेटला पहिल्याच भेटीत खूप पुढे गेला. दिसायला तो चांगला माणूस वाटत होता. त्याच्या बोलण्यावरून तो पुढचा विचार करतो असं दिसत होतं.
2 / 10
मी त्याच्या बोलण्यात अडकत गेले. जसं जसं त्याने सांगितले मी करत होते. पण जेव्हा माझ्यासमोर त्याचं सत्य उघड झालं तोपर्यंत मी माझं सर्वस्व गमावून बसले होते. हा धक्कादायक अनुभव आहे एका महिलेचा, जी तिच्या ३ मुलांसोबत राहते.
3 / 10
ही एक सिंगल मदर आहे जी एकदिवस टिंडरवर तिच्यासाठी साथीदार निवडत होती. ४२ वर्षीय या महिलेचा शोध लवकरच संपला जेव्हा तिला तिचा पसंतीचा जोडीदार सापडला. या व्यक्तीचं नाव जेम्स होतं. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू मैत्रीच्या पलीकडचं नातं तयार झालं.
4 / 10
टिंडरच्या प्रोफाईलमध्ये जेम्सचा फोटो एखाद्या हॉलिवूड सिनेमातील हिरोसारखा वाटत होता. तो अशाप्रकारे बोलायचा ज्यातून ही महिला त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू लागली. एकेदिवशी बोलता बोलता जेम्सनं असं काही केले जे ऐकून महिलेला धक्का बसला.
5 / 10
जेम्सनं महिलेसोबत एकदिवशी क्रिप्टोकरेंसीचा उल्लेख केला. त्यानंतर रोज त्यांच्यात याबाबत बोलणं झालं. त्यानंतर अचानक जेम्सच्या बोलण्यात बदल जाणवला त्यानंतर महिला चिंतेत पडली. जेम्सचं बोलणं आणि त्यानंतर महिलेला त्याने क्रिप्टो वॉलेटसाठी मनवलं.
6 / 10
क्रिप्टो वॉलेट एक वर्चुलेट वॉलेट असून ज्यातून क्रिप्टोकरेंसी खरेदी आणि ठेवली जाते. जेम्सनं महिलेला विश्वासात घेत तिला क्रिप्टोकरेंसी बिझनेस करण्यासाठी तयार केले. महिलाही त्याच्यावर खूप विश्वास ठेवू लागली. जसं जेम्स सांगत होता तसं ती महिला करत होती.
7 / 10
जेम्सनं आधी ३०० पाऊंड रक्कम लावायला सांगितली. त्यावर मला ८० पाऊंड फायदा झाला. त्यानंतर मला १०० पाऊंड बिझनेस सांगितला त्यावर ९३ पाऊंड फायदा झाला. परंतु मला ही रक्कम काढता आली नाही. त्यानंतर जेम्सनं महिलेला सांगितलं, उद्या मोठी रात्र येणार आहे.
8 / 10
या महिलेनं सांगितले की, जेम्सनं मला आणखी पैसे क्रिप्टोकरेंसीमध्ये लावण्यास सांगितले. त्यानं मला यावर्षीचा सर्वात मोठा सौदा होणार आहे असं सांगितले. त्यातून जवळपास ८०० टक्के फायदा तू कमावू शकतेस असं जेम्सनं महिलेला सांगत तिला पैसे गुंतवण्यासाठी आकर्षिक केले.
9 / 10
जेम्सच्या बोलण्यात फसून महिलेनं तिच्याजवळील सर्व रक्कम क्रिप्टो ट्रेडिंग अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली. ही पूर्ण रक्कम ३५०० पाऊंड होती. त्यानंतर जेम्सनं एका व्यक्तीची ओळख त्याचे काका असल्याचं सांगून केली. ज्यांना क्रिप्टोमधून ८६ हजार डॉलरचा फायदा झाल्याचं म्हटलं, या महिलेनं तिच्या खात्यातील पैसे तपासले तेव्हा बॅलेन्स झिरो होता.
10 / 10
महिलेला संशय आला, तिने तिच्या जुन्या मित्राशी चर्चा केली. त्यानंतर ही फसवणूक असल्याचं उघड झालं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. या फसवणुकीत महिलेनं ६००० पाऊंड गमावले होते. तिने जेम्सला विचारणा केली तेव्हा त्याने जाऊन मर जा असं सांगत, टिंडरवरील त्याचे खातेही बंद केले. आता या प्रकरणात पोलिसांकडे गुन्हा नोंद असून तपासाला सुरुवात झाली आहे.
टॅग्स :fraudधोकेबाजी