According to the police, Shraddha had heard Aaftab talking to a girl on the phone.
Shraddha Murder Case: श्रद्धाने आफताबला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकलं अन्...; मोठं गूढ उलघडलं! By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 9:53 AM1 / 6संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे. आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 2 / 6पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने चौकशीदरम्यान सांगितले की, श्रद्धाने त्याला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकले होते, त्यानंतर दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. तसेच लग्नाच्या बहाण्यानं श्रद्धाला आफताब दिल्लीत घेऊन गेला होता. अनेक दिवस उलटल्यानंतर श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावल्यामुळे आपण कंटाळून तिची हत्या केल्याची कबूली दिली.3 / 6श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना अद्याप तीन प्रमुख पुरावे सापडण्याची प्रतीक्षा आहे. श्रद्धाची हत्या केली ते शस्त्र, तिचे शिर आणि मोबाईल हे ते तीन पुरावे. दरम्यान, आफताबच्या स्वयंपाकघरातून पोलिसांना रक्ताचे डाग सापडले आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.4 / 6दरम्यान, आरोपी आफताबचे वडील अमीन पुनावाला आणि आई वसई येथील युनिक पार्क सोसायटीमध्ये राहत होते. मात्र पंधरा दिवसांपूर्वीच आफताबचे त्यांनी घर रिकामे करुन मुंबईत शिफ्ट होतो, असं सांगून निघून गेल्याची माहिती या सोसायटीच्या आदिल खान या पदाधिकाऱ्याने लोकमतला दिली. मात्र आपल्या मुलाने मोठा गुन्हा केल्याचे कळल्यानंतर आपले राहण्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय आफताबच्या पालकांनी घेतला नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.5 / 6श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल.6 / 6श्रद्धा वालकर इन्स्टाग्रामवर फारशी सक्रिय नव्हती. तिच्या हत्येच्या एक आठवडा आधी, तिने हिमाचल प्रदेशमध्ये स्वतःचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र पोस्ट केले होते. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी तिने आफताबसोबत एक फोटो पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले ‘’हॅपी डेज’’. आफताबसोबत तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा एकमेव फोटो होता. आणखी वाचा Subscribe to Notifications