शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाईंदर येथे कांदळवनमधील हातभट्टीवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 21:28 IST

1 / 5
पोलीस हवालदार देसाई यांना बुधवारी पहाटे ४ वाजता बातमीदारा मार्फत मुर्धाखाडी येथे कांदळवन मध्ये हातभट्टी चालत असल्याची माहिती मिळाली.
2 / 5
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास बाबर सह शिंदे, मुल्ला, सानप यांच्या पथकाने भाईंदर खाडी येथून खाजगी बोटीने दलदलीतुन जात धाड टाकली. पोलिसांना पाहताच हातभट्टी माफिया राजू कोळी व अविनाश पाटील हे कांदळवन मधून पळून गेले.
3 / 5
पोलिसांना घटनास्थळी प्रत्येकी २०० लिटर मापाचे ५० ड्रम गावठी दारूच्या कच्या रसायनाने भरलेले मिळून आले. गावठी दारू तयार करण्यासाठी भट्टी, गो गॅस कंपनीचे २५ सिलेंडर व अन्य साहित्य सापडले. पोलिसांनी कच्चे रसायन हे जागीच नष्ट केले व सिलेंडर जप्त केले आहेत.
4 / 5
भाईंदर पोलीस ठाण्यात हातभट्टी माफिया अविनाश पाटील व राजू कोळी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 / 5
पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सदर कांदळवन वन विभागाकडे असल्याने माफियांवर वन कायद्या खाली गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोडPoliceपोलिस