शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Atul and Rinki, Pinki Marriage: अकलूजचे लग्न: तरुणावरच गुन्हा का? दोन जुळ्या बहिणींवर का नाही? कुठे फसला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 12:26 PM

1 / 10
अकलूजमधील एका तरुणाचे दोन जुळ्या बहिणींसोबत लग्न देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. व्हिडीओ तर व्हायरल झालाच पण त्यानंतर त्या तरुणाच्या मागे पोलीस आणि सामाजिक संघटना ज्या काही हात धुवून मागे लागल्या आहेत. त्यावरून त्या तरुणाला पस्तावल्यासारखे वाटत असेल.
2 / 10
रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहीणींनी अतुल नावाच्या तरुणाशी एकाच वेळी, एकाच मंडपात लग्न केले. हे लग्न कायदेशीर कसे काय होईल असा प्रश्न लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विचारला जात आहे. यामुळे पोलिसांनी आयपीसी ४९४ नुसार अतुलवर गुन्हा दाखल केला आणि तपासही सुरु झाला.
3 / 10
आता अनेकांच्या मनात असा प्रश्न येत आहे की, त्या तरुणावर का गुन्हा दाखल झाला? जुळ्या बहिणींवर का नाही? याचे कायदेतज्ज्ञांनी दिलेले उत्तर असे की, दोन्ही तरुणींचे हे पहिलेच लग्न होते, तर त्या तरुणाचे दुसरे होते. यामुळे या प्रकरणात फक्त तरुणावरच म्हणजे अतुलवरच गुन्हा दाखल झाला आहे. त्या बहिणींवर नाही.
4 / 10
म्हणजेच अतुलने जेव्हा रिंकी हिने वरमाला घातली ते त्याचे पहिले लग्न झाले. जेव्हा पिंकीला त्याने वरमाला घातली तेव्हा खरा अतुल अडचणीत आला. म्हणजे अतुलचे हे दुसरे लग्न ठरले. तर दोघींचेही हे पहिलेच लग्न ठरले. हिंदु विवाह कायद्यानुसार अतुलने दोन लग्ने केली तर त्या दोघींनी एकच लग्न केले. म्हणजे अतुल दोषी ठरला.
5 / 10
हिंदू विवाह कायदा १९५५ नुसार पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला नाही तर दुसरे लग्न करता येत नाही. असे केल्यास आयपीसी ४९४ नुसार तो गुन्हा ठरतो. जर पती किंवा पत्नी जिवंत असेल आणि कोणी दुसरे लग्न केले तर त्याला कायदेशीर मान्यता मिळत नाही. तसेच दुसरे लग्न करणाऱ्या पती किंवा पत्नीला ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड केला जाऊ शकतो.
6 / 10
वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्माचे लोक हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह करतात. मुस्लिम हे मुस्लिम पर्सनल लॉ द्वारे शासित आहेत आणि ख्रिश्चन ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट द्वारे शासित आहेत.
7 / 10
काही नाती अशी असतात ज्यात लग्न होऊ शकत नाही. कोणत्याही मुलासाठी त्याच्या वडिलांची आई म्हणजे आजीसोबत, आत्या, आईची आई, आईची बहीण, जर कोणाशी दुधाचे नाते असेल (मुलगा आणि मुलगी एकाच आईपासून जन्मले असतील तर) तर अशा नात्यात लग्न करता येत नाही.
8 / 10
मुस्लिम कायद्यानुसार विधवा, घटस्फोटित किंवा निराधार मुलीला आधार देण्यासाठी एकाच वेळी दोन विवाह करता येतात. कोणतीही व्यक्ती संपूर्ण आयुष्यात 4 लग्न करू शकते. यातही चार कायदे आहेत, त्या नुसार आधीच्या पत्नीची परवानगी घेणे किंवा न घेणे अवलंबून असते.
9 / 10
ख्रिश्चन, पारसी धर्मात दोन लग्नांना परवानगी आहे का? दोन्ही धर्मात एकाच वेळी दोन विवाह करता येत नाहीत.
10 / 10
अतुलवर दोन्ही बहिणींशी लग्न केले म्हणून ही वेळ आली. अतुलने फक्त एका बहिणीशी लग्न केले असते आणि पत्नीच्या परवानगीने दुसऱ्या बहिणीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत असते, तर त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला गेला नसता. ही माहिती दैनिक भास्करने दिली आहे.
टॅग्स :marriageलग्न