शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाउंसरने पैशांसाठी अब्जाधीशाच्या मुलीला बनवलं गर्लफ्रेन्ड, नंतर केली तिची हत्या; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:29 PM

1 / 6
एका व्यक्तीवर पैशांसाठी आपल्या गर्लफ्रेन्डची हत्या करण्याचा आरोप लागला आहे. या व्यक्तीने ज्या तरूणीची हत्या केली ती एका अब्जाधीशाची मुलगी होती आणि तिच्या बॅंक खात्यात लाखो रूपये होते. हत्येनंतर तिचं क्रेडीट कार्ड, एटीएम इत्यादी गायब करण्याचा आरोप तिच्या बॉयफ्रेन्डवर आहे. सध्या या केसची सुनावणी सुरू आहे. ज्यात तरूणीचा जीव कसा गेला याबाबत सांगण्यात आलं.
2 / 6
'द सन'च्या रिपोर्टनुसार, स्वित्झर्लॅंडच्या एका हॉटेलमध्ये २२ वर्षीय ब्रिटीश तरूणी एना रीड मृतावस्थेत आढळून आली. हॉटेलमध्ये ती तिचा जर्मन बॉयफ्रेन्ड मार्क शेजलसोबत थांबलेली होती. शेजल एक बाउंसर आहे. आरोप आहे की, डॉक्टरांना फोन करण्याआधी त्याने एनाची हत्या केली होती. जेव्हा या केसची कोर्टात सुनावणी झाली तेव्हा शेजलने दावा केला की, एनाचा मृत्यू शरीरसंबंध ठेवताना झाला होता.
3 / 6
पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, एना रीडचा मृत्यू गळा आवळल्याने झाला होता. तिच्या शरीरावर छोटे कापल्याचे निशाण आणि काही फ्रॅक्चरही होते. सांगितलं गेलं की, मार्क शेजल जो पब आणि नाइट क्लबमध्ये बाउंसर म्हणून काम करत होता. त्याने एनासोबत संबंध ठेवताना तिचा गळा दाबला.
4 / 6
दरम्यान शेजरवर ४० लाखांपेक्षा जास्त रूपयांचं कर्ज होतं. अशात जेव्हा त्याला समजलं की, त्याच्या गर्लफ्रेन्डच्या खात्यात २५ लाख रूपयांपेक्षा अधिक आहेत. तेव्हा त्याने हे पैसे गायब करण्याचा प्लॅन केला. त्याने आधी एनाची हत्या केली नंतर त्याने शरीरसंबंध ठेवताना तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. कोर्ट लकरच आता २०१९ सालच्या या केसचा निर्णय देऊ शकतं.
5 / 6
सुनावणी दरम्यान या घटनेच्या दिवशी कपलच्या बाजूच्या रूममध्ये थांबलेल्या लोकांनी सांगितलं की, त्या रात्री दोघांच्या रूममधून भांडणाचा आवाज येत होता. भांडी किंवा काच तोडण्याचाही आवाज येत होता.
6 / 6
असं वाटत होतं की, त्यांच्यात भांडण सुरू होतं. कारण कथितपणे एनाने शेजलकडून खर्च करण्यात आलेल्या पैशांचा हिशेब मागितला होता. इतकंच नाही तर जेव्हापासून तिची भेट शेजलसोबत झाली होती तेव्हापासून तिचा खर्चात वाढ झाली होती.
टॅग्स :Switzerlandस्वित्झर्लंडLondonलंडनCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय