आर्यन ड्रग्ज प्रकरणः NCBविरोधात केलेल्या आरोपांचा तपास पूर्ण, समीर वानखेडेंसह ३ अधिकाऱ्यांना बोलावले दिल्लीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 16:40 IST
1 / 8बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणी एनसीबीविरोधात केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी दक्षता तपास (व्हिजिलन्स) जवळपास पूर्ण झाला आहे. 2 / 8तपासाच्या शेवटच्या फेरीत पुन्हा एकदा एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना एनसीबी दक्षता पथकाने चौकशीसाठी दिल्लीला बोलावले आहे. 3 / 8आर्यन खान ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी आशिष रंजन प्रसाद, व्हीव्ही सिंग आणि समीर वानखेडे या तिघांच्या चौकशीची शेवटची फेरी दिल्लीत होणार आहे.4 / 8आशिष रंजन यांना ११ फेब्रुवारीला म्हणजेच उद्या दिल्लीत व्हिजिलन्सच्या तपासाला सामोरे जावे लागणार आहे. ही त्यांची तिसऱ्यांदा चौकशी होत आहे. दुसरीकडे, व्हीव्ही सिंग यांना १२ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचवेळी दक्षता पथक १३ फेब्रुवारीला समीर वानखेडेची तिसऱ्यांदा चौकशी करणार आहे.5 / 8या प्रकरणी दक्षता पथकाकडून आतापर्यंत केवळ किरण गोसावी याचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांनी त्याच्या गावात पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली.6 / 8या प्रकरणाचा तपास दक्षता पथकाचे प्रमुख आणि डीडीजी एनआर ज्ञानेश्वर सिंह करत आहेत, जे जवळपास तीन वेळा मुंबईत गेले आहेत आणि त्यांनी स्वतः सर्व लोकांचे जबाब नोंदवले आहेत.7 / 8या प्रकरणाचा तपास दक्षता पथकाचे प्रमुख आणि डीडीजी एनआर ज्ञानेश्वर सिंह करत आहेत, जे जवळपास तीन वेळा मुंबईत गेले आहेत आणि त्यांनी स्वतः सर्व लोकांचे जबाब नोंदवले आहेत.8 / 8घटनेशी संबंधित घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजचाही या प्रकरणात बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे.