शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aryan Khan: आर्यन खान अख्खी क्रूझ विकत घेईल; वकिलांचा युक्तीवाद 'फेल', कोर्टात काय काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 6:22 PM

1 / 8
क्रूझवरील रेव्ह पार्टीवर एनसीबीने मारलेल्या छाप्यात शाहरुखचा मुलगा आर्यन खानला न्यायालयाने 7 ऑक्टोबरला एनसीबी कोठडी सुनावली आहे. आर्यन खानला जामीन मिळविण्यासाठी वकील सतीश मानशिंदे यांनी जोरदार युक्तीवाद केला. परंतू तो पुरेसा ठरला नाही. एनसीबी कोठडी घेण्यास यशस्वी ठरली. या युक्तीवादावेळी मानशिंदे यांनी आर्यन खान अख्खी क्रूझ विकत घेईल असे वक्तव्य केले. (No Bail For Shah Rukh Khan's Son Aryan In Drugs Case; what happened in Court, Satish Manshinde's arguments)
2 / 8
आर्यन खानची बाजू मांडण्यास सुरुवात करताच मानेशिंदेंनी याआधीच्या प्रकरणांचा दाखला देण्याचा सपाटाच सुरू केला. सर्व प्रकरणांचा दाखल दिल्यानंतरही सरकारी वकिलांनी जामीन देणं योग्य ठरणार नसल्याचं म्हणताच मानेशिंदे म्हणाले.
3 / 8
यानंतर सरकारी वकिलांनी आर्यन खानला पार्टीत कशासाठी बोलविण्यात आले होते, तो कुठल्या केबिनमध्ये थांबला होता आदीची माहिती मिळवायची आहे असे कोर्टाला सांगितले. यावर आर्यन खान यांचे वकील मानशिंदे यांनी त्याला जहाजावर ड्रग्ज विकण्याची गरज नाहीय. तो क्रूझवर का गेला होता त्याच्याशी एनसीबीचे काहीही देणेघेणे नाही. आर्यनला वाटल्यास तो अख्खी क्रूझ विकत घेईल, असे उत्तर दिले.
4 / 8
जेव्हा मानशिंदेनी आर्यन खानजवळ ड्रग्ज सापडले नाही, त्याच्या सोबतच्यांकडे सापडले. यामुळे माझ्या अशीलाचा ड्रग्जशी काहीही संबंध नसल्याचा युक्तीवाद केला तेव्हा तो त्या जहाजावर का आला होता असा सवाल करण्यात आला. यावर मानशिंदेंनी मग त्या जहाजावरील 1000 लोकांनाही अटक करणार का असा सवाल उपस्थित केला.
5 / 8
एनसीबीच्या वतीनं अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. क्रूझवरून अटक करण्यात आलेल्या आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना ९ दिवसांची एनसीबी कोठडी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.
6 / 8
आर्यनच्या फोनमधून आक्षेपार्ह बाबी हाती लागल्या असल्याचं सिंह यांनी न्यायालयाला सांगितलं. 'आर्यनच्या फोनमध्ये सापडलेले काही फोटो आक्षेपार्ह आहेत. आर्यनच्या फोनमध्ये सापडलेल्या लिंक्स आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आहेत,' असा दावा सिंह यांनी केला.
7 / 8
'आर्यनच्या फोनमधील चॅटमध्ये काही कोडनेम आढळून आली आहेत. त्यांचा उलगडा करण्यासाठी त्याची कोठडी मिळायला हवी. मोबाईलमध्ये सापडलेल्या लिंक्स आणि त्यामागचं रॅकेट उजेडात आणण्यासाठी कोठडी गरजेची आहे. ड्रग्ज तस्करांशी व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून आपत्तीजनक चॅट करण्यात आलं आहे. या प्रकरणातही छापेमारी सुरू आहे,' अशी माहिती सिंह यांनी न्यायालयाला दिली.
8 / 8
आर्यनच्या चॅटमधून पैशांचे व्यवहार झाल्याचंही समोर आलं आहे. बँक व्यवहारांसाठी रोख रकमेची मागणी करण्यात आल्याचा उल्लेखही चॅटमध्ये असल्याचं सिंह यांनी न्यायालयाला सांगितलं.
टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीCourtन्यायालय