शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aryan Khan Drug Case: गोसावीने आर्यन खानसोबत सेल्फी कशासाठी काढला होता? समोर आले फोटोसह व्हिडीओचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 12:48 PM

1 / 9
गेल्या वर्षी कार्डेलिया क्रूझवर एनसीबीने रेड मारली ते प्रकरण खूप गाजले होते. सुमारे महिनाभर किंग खानचा मुलगा आर्यन खान तुरुंगात होता. गेल्या आठवड्यात एनसीबीने आर्यन खानकडे ड्रगच सापडले नाही, असे सांगत त्याला क्लिन चिट दिली होती. आता आर्यन खानला पकडले तेव्हाचा पहिला व प्रचंड व्हायरल झालेल्या फोटोमागचे रहस्य समोर आले आहे. याचसोबत आर्यन खान कोणासोबत फोनवर बोलत होता, त्याची देखील माहिती समोर आली आहे.
2 / 9
पंच असलेल्या किरण गोसावीने आर्यन खानला पकडलेले तेव्हा त्याच्यासोबत सेल्फी काढला होता. त्याचबरोबर किरण गोसावीने कोणला तरी फोन लावून दिला होता, त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.
3 / 9
यावर एनसीबीच्या एसआयटीने किरण गोसावीची पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये जाऊन चौकशी केली. यामध्ये किरण गोसावीने आर्यनचा सेल्फी का घेतला आणि फोनवर कोणाशी बोलणे करून दिले याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांना दिली आहे.
4 / 9
एनसीबीने न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये याचा उल्लेख आहे. २ ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा मारला होता. त्यानंतर किरण गोसावी आर्यन खानसोबत दिसत होता. त्यानेच आर्यन खानला पळत पळत एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणले होते. आपल्या मित्रांना दाखविण्यासाठी आर्यन खानसोबत सेल्फी काढला होता, असे उत्तर किरण गोसावीने दिले आहे.
5 / 9
आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते. परंतू तो आर्यन खान असल्याचे समजल्यावर लोक घोळका करतील म्हणून त्याला घेऊन इतरांपासून बाजुला बसलो होतो. तेव्हा आपण आपल्या मित्रांना दाखविण्यासाठी सेल्फी काढल्याचे किरण गोसावी म्हणाला.
6 / 9
याचबरोबर फोनवर बोलतानाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला, त्यावर देखील किरण गोसावीने एनसीबीला स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडीओवरून एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्याला किंवा शाहरुख खानला फोन लावण्यात आल्याची चर्चा होती. परंतू किरण गोसावीने आपल्या एका मित्राला आर्यन खानचा आवाज ऐकायचा होता, त्याला फोन लावून दिलेला असे उत्तर दिले आहे.
7 / 9
''मी यावर काहीही बोलू इच्छित नाही, कारण सर्वत्र हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मला त्यावरून प्रचंड टीकेचा सामना करावा लागला आहे. तो एक साधा क़ॉल होता, माझ्या एका मित्राला त्याचा आवाज ऐकायचा होता'', असे किरण गोसावी म्हणाला.
8 / 9
किरण गोसावीला विविध फसवणुकीच्या गुन्ह्यांखाली महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. तो येरवडा जेलमध्ये आहे. एनसीबीच्या एसआयटी टीमने त्याला तिथे जाऊन ३६ प्रश्न विचारले. यावेळी त्याने आर्यन खानची झडती घेण्यात आली परंतू त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले नाहीत, असे सांगितले.
9 / 9
हा सेल्फी व्हायरल झाला तेव्हा किरण गोसावी अनेकांना माहिती नव्हता. यामुळे त्याला एनसीबी अधिकारी असल्याचे म्हटले गेले होते. नंतर तो एनसीबीचा खासगी पंच असल्याचे समोर आले. यानंतर त्याची अनेक प्रकरणे समोर आली. एनसीबीचे तत्कालीन मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांची आता या प्रकरणावरून बदली करण्यात आली आहे.
टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोSameer Wankhedeसमीर वानखेडे