शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aryan Khan Drugs Case: ड्रग्जचे ‘डार्क वेब’ आणखी उसवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 9:21 AM

1 / 5
क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून सध्या बराच वाद सुरू आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन या प्रकरणात अडकल्याने संपूर्ण झोत त्याच्यावर केंद्रित झाला आहे. त्यानिमित्ताने बॉलीवूड आणि अमली पदार्थ यांच्या परस्परसंबंधांवर बराच खल होत आहे. नार्कोटिक कंट्रोल ब्युरोही चर्चेच आला आहे.
2 / 5
अमली पदार्थांच्या व्यवहारांवर नियंत्रण आणणारा नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रोपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा अस्तित्वात आहे. हा कायदा असूनही डार्क वेबच्या माध्यमातून अमली पदार्थांचे व्यवहार सर्रासपणे होत असतात. अमली पदार्थ वापराच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी या कायद्यातील तरतुदी आणखी कठोर करण्याचा विचार आहे.
3 / 5
एनडीपीएस कायदा सध्या अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या कक्षेत येतो. मात्र, हा कायदा आपल्या अधिकारक्षेत्रात यावा यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय उत्सुक आहे. कायद्याची अंमलबजावणी महसूल खाते करत असले तरी पुढील कारवाईसाठी राज्यांशी समन्वय साधणे हे काम गृह मंत्रालयाचे आहे.
4 / 5
एनडीपीएस कायद्याचे अंमलबजावणी सूत्र आपल्याकडे यावे, असे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे. कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अधिक सुसूत्र करण्यावर गृह मंत्रालयाचा भर असेल. महसूल विभागाने मात्र या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. अमली पदार्थांच्या आयात-निर्यातीवर लक्ष ठेवणे हे आमचे काम असल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे.
5 / 5
एनडीपीएस कायद्यातील तरतुदी आणखी कठोर केल्या जाणार आहेत. तसेच तरतुदींमध्येही वाढ केली जाणार आहे.
टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी