शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aryan Khan Drugs Case: आर्यन खानची पुन्हा वेळ वाईट! फक्त दोन दिवस हाती, पुढचा पंढरवडा जेलमध्येच...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 5:25 PM

1 / 8
गेल्या आठवड्यात आर्यन खानच्या (Aryan khan) जामिन अर्जावर सेशन कोर्टात दोन दिवस सुनावणी चालली होती. पण युक्तीवादाला वेळ पुरला नाही की धुरंदर वकिलांच्या दसऱ्याच्या सुट्ट्या लक्षात आल्या नाहीत, आर्यन खानला जामिनावरील निकालासाठी (Bail Plea) 20 ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागली होती. तसाच प्रकार आताही घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2 / 8
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानच्या जामिन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आजचा दुसरा दिवस आहे. कोणत्याही क्षणी आर्यन खानच्या जामिनावर निकाल येऊ शकतो. एक दिलासा देणारी बाब म्हणजे आर्य़न खानसोबत अटकेत असलेल्या दोघांना काल जामिन मिळाला आहे.
3 / 8
परंतू आर्यन खानच्या जामिनावर आज निकाल झाला नाही किंवा सुनावणी उद्या, परवावर लांबली तर पुन्हा वेळ वाईट म्हणण्याची वेळ शाहरुख खानवर येणार आहे.
4 / 8
आर्यन खानला जामिन मिळण्यासाठी तीन दिवस शिल्लक आहेत. दिवाळी सुट्ट्यांच्या आधीच जर जामिन मिळाला तर आर्यन खान बाहेर येऊ शकतो. नाही मिळाला तर वरच्या न्यायालयात शाहरुख खान दाद मागू शकतो. यामुळे येत्या दोन दिवसांत जो काही तो निकाल हाती येणे गरजेचे आहे.
5 / 8
मुंबई उच्च न्यायालयाला आजपासून तीव दिवसांच्या आत आर्यन खानच्या जामिनावर निर्णय द्यावा लागणार आहे. कोर्टाच्या दिवाळी ब्रेकआधी निकाल देणे गरजेचे आहे. ही बाब आर्यनच्या वकिलांनी ध्यानात ठेवायला हवी. जर त्याला जामिन मिळाला नाही तर त्याची दिवाळी आणि त्यापुढील सारे दिवस म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगात रहावे लागणार आहे.
6 / 8
मुंबई उच्च न्यायालयाच्या दिवाळी सुट्ट्या 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. 1 ते 6 नोव्हेंबर दिवाळी हॉलिडे असेल. तर 12 नोव्हेंबरपर्यंत कोर्ट बंद राहणार आहे. 13 आणि 14 नोव्हेंबरला शनिवार, रविवार असल्याने त्यादिवशीही कोर्ट बंदच राहणार आहे.
7 / 8
दिवाळी हॉलिडेआधी 30 आणि 31 ऑक्टोबरला देखील शनिवार रविवार येत आहे. यामुळे कोर्टाचे कामकाज 29 ऑक्टोबरपर्यंतच चालणार आहे. यानंतर थेट हाय कोर्ट 15 नोव्हेंबरलाच उघडणार आहे.
8 / 8
2 ऑक्टोबरला आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर तो एनसीबीच्या ताब्यात होता. ऑर्थर रोड तुरुंगात जाऊन त्याला आता 20 दिवस झाले आहेत.
टॅग्स :Aryan Khanआर्यन खानHigh Courtउच्च न्यायालयNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी