शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Baba Siddique : रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 9:08 AM

1 / 12
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता असं समोर आलं आहे की, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यापूर्वी हल्लेखोरांनी बाईकवरून त्यांच्या घराची रेकी केली होती.
2 / 12
घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना एक बॅगही सापडली असून त्यात एका आरोपीचं आधारकार्ड सापडलं आहे. पोलीस तपासात असं समोर आलं की, शूटर्स बाबा सिद्दिकी यांच्या घराची रेकी करण्यासाठी बाईक वापरत होते. काही दिवसांपूर्वी ते बाईकवरून पडले, त्यामुळे घटनेच्या दिवशी ते ऑटोने आले.
3 / 12
बाईकसाठी आरोपी प्रवीण लोणकर याने हरीश निषाद याला ६० हजार रुपये दिले होते. पुणे येथून बाईक घेण्यासाठी ३२ हजार रुपये दिले होते. गोळीबार करणाऱ्यांनी घटनास्थळी बाबा सिद्दिकी यांची ४५ मिनिटं वाट पाहिली होती, असंही तपासात समोर आलं आहे.
4 / 12
बाबा सिद्दिकीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. धर्मराज कश्यप आणि हरीश कुमार निषाद, गुरमेल सिंह आणि प्रवीण लोणकर यांना अटक करण्यात आली आहे. गुरमेल आणि धर्मराज यांच्यावर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
5 / 12
बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. या प्रकरणातील तीन आरोपी मोहम्मद झिशान अख्तर, शुभम लोणकर आणि शिवकुमार गौतम हे अद्याप फरार आहेत. या हत्येचा सूत्रधार झिशान असल्याचं म्हटलं जात आहे.
6 / 12
फरार आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत. ही पथके यूपी, पंजाब, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये तपास करत आहेत. सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडली त्या ठिकाणापासून सुमारे २५० मीटर अंतरावर एक बॅग सापडली. या बॅगेत तुर्की मेड ७.६२ मिमीचं ऑटोमॅटिक पिस्तूलही होतं.
7 / 12
या पिस्तुलने बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळी झाडली असावी, असा अंदाज आहे. तसेच बॅगेत शिवकुमार गौतम याचं आधार कार्ड, बाईक खरेदीची स्लिप आणि शर्ट असल्याचं पोलिसांनी सांगितलं. गुन्हा केल्यानंतर धर्मराज आणि गुरमेल या दोन आरोपींनी शर्ट बदललं.
8 / 12
शिवकुमारने शर्ट बदलून बॅग फेकून तेथून पळ काढल्याचा संशय आहे. पोलिसांनी सांगितलं की, गौतमनेच कश्यप आणि गुरमेल सिंह यांना कुर्ल्यातील भाड्याच्या घरात पिस्तूल चालवण्याचं ट्रेनिंग दिलं होतं. हल्लेखोर सुमारे चार आठवडे यूट्यूब व्हिडीओ पाहून गन लोड आणि अनलोड करायला शिकले होते.
9 / 12
मंगळवारीच गुन्हे शाखेचं पथक कुर्ल्यातील आरोपी भाड्याने राहत असलेल्या घरात गेले होते. पोलिसांनी सांगितलं की, बाबा सिद्दिकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी करण्यासाठी वापरलेली बाईक आणि दोन हेल्मेट जप्त करण्यात आले आहेत.
10 / 12
गुरमेल सिंहला बनावट पासपोर्टवर देशातून पळून जाण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन देण्यात आले होते, कारण त्याच्यावर भारतात हत्येची केस सुरू आहे. शूटर्सनी गेल्या महिन्यात वांद्रे आणि आसपासच्या भागात सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी १० हून अधिक वेळा प्रयत्न केले होते. पण ते त्यामध्ये अयशस्वी ठरले.
11 / 12
गोळीबार करणाऱ्यांना बाबा सिद्दिकी यांचा फोटोही देण्यात आला असून हे टार्गेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. घटनेच्या २५ दिवस आधी घर आणि ऑफिसची रेकीही केली होती. आरोपींनी चॅटिंगसाठी स्नॅपचॅट आणि कॉलिंगसाठी इन्स्टाग्रामचा वापर केल्याचं तपासात समोर आलं आहे.
12 / 12
गोळीबार करणाऱ्यांना बाबा सिद्दिकी यांचा फोटोही देण्यात आला असून हे टार्गेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. घटनेच्या २५ दिवस आधी घर आणि ऑफिसची रेकीही केली होती. आरोपींनी चॅटिंगसाठी स्नॅपचॅट आणि कॉलिंगसाठी इन्स्टाग्रामचा वापर केल्याचं तपासात समोर आलं आहे.
टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस