शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 4:56 PM

1 / 10
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी दररोज नवनवे खुलासे करत आहेत. आणखी एक खळबळजनक खुलासा या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सुमित वाघ याने केला आहे.
2 / 10
मुंबई क्राईम ब्रांचने याप्रकरणी सुमित वाघ याला नागपुरातून अटक केली होती. वाघ हा या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर याचा मित्र असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
3 / 10
आरोपी सुमित वाघ याने चौकशीत सांगितलं आहे की, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना आपण कट रचताना पैसे पाठवले होते आणि या व्यवहाराच्या बदल्यात कमिशन म्हणून ५० हजार रुपयेही मिळाले होते.
4 / 10
शुभम लोणकरच्या सांगण्यावरूनच जून महिन्यात आरोपींना पैसे पाठवल्याचं सुमितने क्राईम ब्रांचच्या चौकशीत उघड केलं. शुभमने त्याला दोन वेळा वेगवेगळ्या आरोपींचे बँक अकाऊंट नंबर दिले आणि तेथे पैसे पाठवण्याची सूचना केली.
5 / 10
आरोपींना पैसे पाठवण्यासाठी आपल्याला कमिशन म्हणून ५० हजार रुपये आणि दुसरा आरोपी सलमान वोहरा (ज्यांच्या नावाने खाते उघडले होते) याला ५० हजार रुपये कमिशन म्हणून दिल्याचा दावा आरोपीने केला आहे.
6 / 10
सुमितने पुढे पोलिसांना सांगितलं की, शुभम लोणकर याने आरोपीच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितलं, त्यावेळी तो पुण्यात हजर होता. कर्नाटक बँकेच्या खात्यातून त्याने कोणाच्या खात्यात पैसे पाठवले होते, त्या आरोपीला तो भेटला नाही किंवा त्याला ओळखतही नाही.
7 / 10
चौकशीदरम्यान, आरोपींनी कर्नाटक बँकेत वोहराच्या नावाने उघडलेल्या खात्यात सुमारे ६ लाख रुपये आल्याचा खुलासा केला. त्यापैकी त्याने आरोपी हरीशकुमार निषादच्या बँक खात्यात ३ लाख रुपये, तर १ लाख रुपये आरोपी रुपेश मोहोळच्या खात्यात आणखी एक लाख रुपये शूटर गुरनैल सिंहचा भाऊ नरेश सिंहच्या खात्यावर पाठवण्यात आले.
8 / 10
आरोपी हरीश निषादच्या खात्यावर पाठवलेल्या तीन लाख रुपयांपैकी दोन लाख रुपये त्याने शूटर धर्मराज कश्यपचा भाऊ अनुराग कश्यपच्या खात्यावर पाठवले आणि ते नंतर अनुरागने काढून शूटर शिवकुमार गौतमला हत्यार विकत घेण्यासाठी दिले.
9 / 10
शुभमच्या सांगण्यावरून कर्नाटक बँक खात्यात ६ लाख रुपये अज्ञात व्यक्तीने जमा केल्याचा दावा आरोपी सुमित वाघ याने केला आहे. शुभमच्या सांगण्यावरून त्याने दोन वेळा वेगवेगळ्या खात्यांवर पैसे पाठवले होते.
10 / 10
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या प्रकरणात आम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत आहोत ज्याच्या नावे कर्नाटक बँकेत सहा लाख रुपये जमा झाले होते. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे.
टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारीMumbai policeमुंबई पोलीस