शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 11:17 AM

1 / 12
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेने नवा खुलासा केला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी स्पेशल २६ शूटर्सची टीम तयार केली होती.
2 / 12
अमेरिकेत बसून लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने अनेक महिने ही 'स्पेशल २६ गँग' तयार केली होती. या गँगमध्ये घेण्यासाठी शूटर्सच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. या ऑनलाईन मुलाखती साबरमती जेलमध्ये असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतल्या होत्या.
3 / 12
मुलाखतीत निवडलेल्या शूटर्सची 'स्पेशल २६ गँग'मध्ये निवड करण्यात आली. अनमोल बिश्नोई व्यतिरिक्त गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी बराड यांनीही मदत केली होती.
4 / 12
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरमेल सिंह, धर्मेंद्र कश्यप आणि शिवकुमार हे तीन शूटर हे लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल बिश्नोईच्या सतत संपर्कात होते. ॲपच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते. गुन्हे शाखेने आतापर्यंत या कटाशी संबंधित अनेकांना अटक केली आहे. त्यांच्याकडे ४ मोबाईल सापडले आहेत.
5 / 12
अनमोल बिश्नोईने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी ५ राज्यांमध्ये शूटर्सची भरती केली. पंजाब, यूपी, राजस्थान, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भरती करण्यात आली होती. त्यानंतर 'स्पेशल 26 गँग' तयार करण्यासाठी या शूटर्सची प्रथम मुलाखत घेण्यात आली.
6 / 12
त्यानंतर साबरमती जेलमध्ये बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने शूटर्सची मुलाखत घेतली आणि त्यांना शॉर्टलिस्ट केलं. यानंतर अनमोल बिश्नोईने निवडक शुटर्सना बाबा सिद्दिकी यांचा फोटो आणि सिग्नल ॲपवर डिटेल्स पाठवला.
7 / 12
'स्पेशल २६ गँग'साठी पंजाबमधून चार मुलांची निवड करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील १४ नेमबाजांचा समावेश होता. यूपीमधून ६ नेमबाज जोडण्यात आले. या टोळीत राजस्थानमधील एक आणि हरियाणातून एका शूटर्सची निवड करण्यात आली.
8 / 12
अनमोल बिश्नोई बाबा सिद्दिकी यांचे मुख्य शूटर्स गुरमेल सिंह, सुजित सिंह, आकाश गिल आणि झिशान अख्तर यांच्याशी ॲपद्वारे संपर्कात होता. हे चौघेही पंजाबचे रहिवासी आहेत. तर, शिवकुमार धर्मराज कश्यप, त्याचा भाऊ अनुराग कश्यप, ज्ञान प्रकाश, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेक प्रताप सिंह हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.
9 / 12
महाराष्ट्रातून आदित्य राजू गुळणकर, रफिक नायक शेख, प्रवीण लोणकर, रुपेश माहोळे, गौरव विलास अपुणे, राम कनोजिया, हरीशकुमार निषाद, नितीन गौतम स्प्रे, संभाजी किशन परिधी, प्रदीप दत्ता, चेतन दिलीप, शुभम लोणकर, शिवम यांना घेतले होते. राजस्थानमधील भगवंत सिंह आणि हरियाणातील अमित कुमार यांचाही या गँगमध्ये समावेश होता.
10 / 12
लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी स्थापन केलेल्या 'स्पेशल २६ गँग'च्या खर्चासाठीही मोठं बजेट ठेवलं होते. अनमोल बिश्नोईने अमेरिकेत राहून पैशाची सर्व व्यवस्था केली होती. यात शूटर्सचं राहणं, भोजन, प्रवास, मोबाईल आणि शस्त्रास्त्रांचा खर्च समाविष्ट होता.
11 / 12
१२ ऑक्टोबरच्या रात्री बाबा सिद्दिकी यांची मुलगा झिशानच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स गँगने हत्येची जबाबदारी घेतली आहे. या गँगने सलमान खान हे हत्येमागचं कारण सांगितलं आहे. सलमानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.
12 / 12
एका रिपोर्टनुसार, शूटर्सनी बाबा सिद्दिकी यांना लक्ष्य करण्यापूर्वी सप्टेंबरमध्ये रायगड जिल्ह्यातील एका धबधब्याजवळील झाडावर गोळीबार करण्याचा सराव केला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीMumbai policeमुंबई पोलीसCrime Newsगुन्हेगारी