शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान कहीं दिल ना चुराले...! सर्वात मादक बिकीनी चोर; ११४ गुन्हे करणारी जगातील 'सेक्सी क्रिमिनल'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 9:15 PM

1 / 14
तुम्ही अनेकदा मोठ मोठ्या गँगस्टर, गुन्हेगार, स्मगलरबाबत ऐकले असेल. आज तुम्ही एक जगातील 'सेक्सी क्रिमिनल'ला भेटणार आहात.
2 / 14
अशी गुन्हेगार जी एक दोन नव्हे तर शेकड्याने गुन्हे करूनही सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. कोणी तिला बिकिनी चोर म्हणतो तर कोणी तिला जगातील सर्वात सेक्सी चोर म्हणतो.
3 / 14
कॅनडाची स्टेफनी ब्युडोइन इतकी सुंदर आहे की, तुम्हालाही विश्वास बसणार नाही की ती चोर आहे. स्टेफनी 2014 मध्ये चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली तेव्हा पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती.
4 / 14
जेव्हा तिला कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा तिचे सौंदर्य पाहून न्यायाधीशही थक्क झाले होते. एवढ्या सुंदर मुलीला चोरीची सवय का लागली, असा प्रश्न कोर्टात उपस्थित सर्वांना पडला होता. यामुळे जगाची उत्सुकता ताणली गेली होती.
5 / 14
तेव्हा स्टेफनी फक्त 22 वर्षांची होती. तिने नर्सिंगचा कोर्सही केला होता. मात्र ऐषारामी जीवन जगण्यासाठी तिला चोरीचे व्यसन जडले होते.
6 / 14
तिने एवढ्या कमी वयात ४४ घरांमध्ये चोरी केली होती. तिची चोरी करण्याची पद्धतही वेगळी होती. ती कोणाच्याही घराचे दरवाजे तोडत नसे, तर खिडकीतून घरात जात असे व घरातील जेवढी सापडतील तेवढी मौल्यवान वस्तू नेत असे.
7 / 14
स्टेफनीने तिच्या टोळीत तीन मुलांचाही समावेश केला होता. स्टेफनीकडून अनेक लक्झरी वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.
8 / 14
स्टेफनीवर चोरी, विना परवाना शस्त्रे बाळगणे आणि अल्पवयीन मुलांना गुन्हे करण्यास प्रोत्साहित करणे यासह 114 आरोप ठेवण्यात आले होते.
9 / 14
या सर्व आरोपांसाठी या तरुणीला ९० दिवसांची शिक्षा झाली. पण ती देखील एवढी विचित्र होती की असे वाटेल त्या न्यायाधीशावरही या सौदर्यवतीने मोहीनी घातली होती.
10 / 14
स्टेफनीला फक्त शनिवार आणि रविवारी तुरुंगात बंद केले जायचे. आठवड्याचे अन्य दिवस ती घरी मोकाट असायची.
11 / 14
कोर्टात हजर राहिल्यानंतरच ती इतकी प्रसिद्ध झाली की तिला मॉडेलिंगच्या अनेक असाइनमेंट्स मिळाल्या, स्टेफनीला हॉलिवूडमधून चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफरही आल्या.
12 / 14
काही काळानंतर, कॅनेडियन फॅशन मासिकाने तिला एक सेक्सी गुन्हेगार म्हणून प्रमोट केले. यामुळे वाद झाला आणि असे नाव देऊन मॉडेलिंगला प्रोत्साहन देणाऱ्या मासिकावर न्यायालयाने बंदी घातली होती.
13 / 14
स्टेफनी अनेकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. सोशल साइट्सवरील तिचे बिकिनी फोटो आजही लोकांच्या होश उडवत असते.
14 / 14
स्टेफनी अनेकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. सोशल साइट्सवरील तिचे बिकिनी फोटो आजही लोकांच्या होश उडवत असते.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी