शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सौंदर्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरात 'असे' काही सापडले की नोकरीच गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 1:42 PM

1 / 6
आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बेकायदेशीर काम केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महिला अधिकाऱ्याच्या घरातून ड्रग्ज, गांजा आणि इतर बेकायदेशीर अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
2 / 6
ब्रिटनमध्य़े ही घटना घडली आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ब्रिटीश मेट्रोपॉलिटन पोलीस अधिकारी रसविंदर अगालियू ही जवळपास 20 वर्षे पोलीस खात्याचा भाग होती. लंडन किंवा वेल्स परिसरात ती जास्तवेळ कार्यरत होती. पण आता तिच्या जुन्या घरावर पडलेल्या छाप्यामुळे तिची नोकरी तर गेलीच, त्यासोबतच अडचणीतही वाढ झाली आहे.
3 / 6
47 वर्षीय रसविंदर वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी पोलीस खात्यात रुजू झाले होती, मात्र आता तिची कारकीर्द संपली आहे. अलीकडेच, लंडन पोलिसांनी तिच्या बंगल्यावर छापा टाकला तेव्हा राहत्या घरी कॅनबिस फार्म म्हणजेच गांजाचे शेत सापडले आहे.
4 / 6
पोलिसांच्या टीमने तिच्या घरातून ड्रग्स, गांजा आणि इतर अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत. यासोबतच रोख रक्कमही सापडली आहे. रसविंदर ही अनेक महिन्यांपासून घरी गांजाची शेती करत होती, असा आरोप करण्यात आला आहे. तिच्यावर अमली पदार्थांच्या तस्करीचाही आरोप आहे.
5 / 6
रसविंदर तीन मुलांची आई आहे. सोशल मीडिया खासकरून फेसबुकवर ती नेहमीच सक्रिय असते. फेसबुकवर ती आपले आणि कुटुंबाचे फोटो शेअर करत असते. रसविंदरने फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केलं आहे. तसेच मॉडलिंगमध्येही नशीब आजमावलं आहे.
6 / 6
रसविंदरच्या विरोधात बसलेल्या चौकशी समितीला असे आढळून आले की त्याने कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि पोलिसांच्या आदेशांचे आणि निर्देशांचे उल्लंघन केले आहे. सेंट्रल वेस्ट कमांड युनिटचे प्रमुख ओवेन रिचर्ड्स म्हणाले की, या महिला अधिकाऱ्याच्या कृत्यामुळे जनतेच्या विश्वासाचे उल्लंघन झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी