Bengaluru Influencer Hitesha Chandranee booked for assaulting Zomato worker Kamaraj
Zomato डिलिव्हरी बॉय मारहाण प्रकरणी आता महिलेच्या विरोधात FIR दाखल By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 11:47 AM1 / 15Zomato वरून मागवलेलं जेवण उशिरानं आल्यानं एका तरूणीनं (hitesha chandranee) ते रद्द केले म्हणून चिडून डिलिव्हरी बॉयनं (Zomato Delivery boy hit on nose) आपल्या नाकावर बुक्का मारल्याचा दावा त्या महिलेनं केला होता. 2 / 15परंतु त्यानंतर अटक केलेल्या झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कामराजनं पोलिसांना चौकशीमध्ये आपली बाजू सांगितल्याचंही समोर आलं होतं. यामध्ये आता पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 3 / 15दरम्यान, आता संबंधित तरूणीवर पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून तिच्यावर डिलिव्हरी बॉयसोबत मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे.4 / 15तरूणीनं झोमॅटो डिलिव्हरी बॉयला चप्पलनं मारलं, त्याला शिवीगाळही केला आणि नंतर त्याचाच विरोधात खोटी तक्रार दाखल केली असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.5 / 15कामराज या डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर तरूणीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस स्थानकात सध्या ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 6 / 15झोमॅटो आणि मॉडेलमधील वाद वाढल्यानंतर कंपनीकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. झॉमेटो कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी सोशल मीडियावर या प्रकरणी म्हणणं मांडलं आहे. झोमॅटो कंपनीकडून हितेशा हीचा वैद्यकीय खर्च उचलला जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.7 / 15हितेशासह कंपनी कामराज याच्याशी सुद्धा संपर्कात आहे. नियमानुसार, कामराज याला निलंबित करण्यात आलं आहे, असे दीपेंद्र गोयल यांनी सांगितलं होचं. एवढंच नव्हे, तर कामराज याचा न्यायालयीन खर्चही उचलला जात आहे, असं गोयल यांनी नमूद केलं होतं.8 / 15कामराजनं गेल्या २६ महिन्यांत ५ हजारांहून अधिक ठिकाणी पार्सल डिलिव्हरी केली आहे. झोमॅटो कंपनीत कामराजला ४.५७ असे उत्कृष्ट रेंटिंग ग्राहकांकडून देण्यात आलं आहे. 9 / 15या प्रकरणात नेमकं काय घडलं, सत्य काय आहे, याचा शोध झोमॅटो घेणार आहे, असंही दीपेंद्र गोयल यांनी सांगितलं होतं.10 / 15पार्सल घेऊन या महिलेच्या घरी पोहोचलो तेव्हा थोडा उशिर झाला होता. मी त्यांची त्यासाठी माफी मागितली. रस्ता खराब आणि वाहतूक कोंडीमुळे पोहोचण्यास उशिर झाला, असं कामराजने त्यांना सांगितलं.11 / 15हितेशा चंद्राणीला कामराजनं बुक्का मारला नाही, उलट कामराज येताच हितेशानंच त्याच्यावर हल्ला केला, असं कामराजने पोलिसांना सांगितल्याचं समोर आलं होतं. हितेशानं जेवण ताब्यात घेतलं परंतु तिनं पैसे देण्यास नकार दिला. ती म्हणाली की ती झोमॅटो कस्टमर सपोर्टशी बोलत आहे.12 / 15हितेशाने यानंतर त्याला अश्लिल शिव्या दिल्या व जोरजोरात ओरडायला लागली. तर झोमॅटो सपोर्टने कामराजला ऑर्डर कॅन्सल केल्याच सांगितल. यामुळे कामराजन तिला जेवण परत करण्यास सांगितल. जेव्हा तिने ते देण्यास नकार दिला तेव्हा तिथून कामराज निघून जात होता.13 / 15यानंतरही ती त्याला शिव्या देत होती. अचानक तिने त्याच्यावर चप्पल उगारली आणि मारायला सुरुवात केली. मी तिला रोखण्यासाठी हात पुढे केला. यावेळी तिचाच हात चुकून तिच्याच नाकावर लागला. मी फक्त तिचा वार रोखण्यासाठी हात पुढे केला होता. तिच्या बोटातील अंगठी तिच्या नाकावर लागली. तिचा व्हिडीओ पाहिल्यास त्यामध्ये स्पष्ट दिसेल असंही कामराजनं पोलिसांना सांगितलं.14 / 15तिच्या नाकावर जखम झाली ती अंगठीमुळे झालीय, ठोसा लगावल्यामुळे नाही, असं कामराज यानं चौकशीदरम्यान सांगितलं होतं. दरम्यान, ऑर्डर केलेलं जेवण तरूणीपर्यंत पोहोचवण्यासाठी फूड डिलिव्हरी बॉयला उशिर झाला. यानंतर त्या तरूणीनं ती ऑर्डर कॅन्सल केली. त्यानंतरही थोड्या वेळानं तो डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन त्या तरूणीच्या घरी पोहोचला.15 / 15परंतु तरूणीनं ते जेवण घेण्यास नकार दिला तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयला राग अनावर झाला आणि त्यानं त्या तरूणीच्या नाकावर बुक्का मारला. त्यानंतर आपल्या नाकातून रक्तही वाहू लागल्याचा दावा तरूणीनं केला होता. त्यानंतर तिनं याचा व्हिडीओ बनवून लोकांना याबाबत माहिती दिली. हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications