The betting racket started in the name of God, the police confiscated 4.25 crore
देवाच्या नावावर सुरु होतं सट्टेबाजीचे रॅकेट, पोलिसांनी जप्त केली सव्वा चार कोटींची रक्कम By पूनम अपराज | Published: October 22, 2020 9:50 PM1 / 6सट्टेबाजीत आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम ४. १९ कोटी रोख जप्त केली आहे. जयपूरच्या जुन्या शहर किशनपोल बाजारातून ४ बुकींकडून पैसे जप्त करण्यात आले आहेत. (All photo - Aaj Tak) 2 / 6त्याच्याकडे दोन नोटा मोजण्याचे यंत्रदेखील होते. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये पकडलेल्या 9 मोबाइल फोनवर सट्टेबाजीसाठी 30 व्हॉट्सअॅप ग्रुप्स बनवले होते.3 / 6हे सर्व राजस्थानातील मोठ्या देवता आणि जयपूरच्या मोठ्या मंदिरांच्या नावावर व्हॉट्सअॅप ग्रुप्स बनवण्यात आले होते.4 / 6जयपूर पोलिस आयुक्तालयाचे एसपी मेघ चंद मीणा म्हणाले की, दुबईत बसून सट्टेबाज व्हॉट्सअॅपवर सट्टेबाजीचे रॅकेट चालवत आहेत आणि कोड वर्डच्या माध्यमातून सट्टा लावतात. 5 / 6मॅच संपल्यानंतर, सट्टेबाजी जिंकणारा आणि त्यांच्यासाठी पोचवली जाणारी बुकींची रक्कम तो येथून डिलेव्हरी केली जात होती. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये गुजरातमधील राजकोटचा रणधीरसिंग, अजमेरचा कृपालसिंग, झुंझुनूचा ईश्वरसिंग आणि जयपूरचा टोडरमल राठौर असे अटक करण्यात आले आहे.6 / 6सट्टेबाजीचा मुख्य सूत्रधार राकेश राजकोट दुबईत बसून देशभरात सट्टेबाजीचे रॅकेट चालवित असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याने डायमंड एक्सचेंज वेबसाइट नावाचा स्वतःचा एक ग्रुप तयार केला आहे, ज्यामध्ये कोड वर्डद्वारे आयडी पासवर्डच्या मह्द्यमातून सट्टा लावला जात असे. व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे आयपीएल दरम्यान गुजरात आणि राजस्थानमध्ये सट्टेबाजीचे रॅकेट चालवत होता. आणखी वाचा Subscribe to Notifications