शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'पाब्लो' जगातील सर्वात मोठा ड्रग माफिया! पैसा एवढा की वाळवी खात होती, क्रूरतेचा विचारच नको

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 5:08 PM

1 / 14
क्राईमच्या दुनियेत तसेतर रोजच अंमली पदार्थ पकडले जात होते. पण अभिनेता सुशांतचा मृत्यू आणि त्याच्या प्रेयसीचे ड्रग्स माफियांशी असलेले कनेक्शन यामुळे ड्रग्जचे विश्व पुन्हा चर्चेत आले आहे. हा धंदा खूप जुना आहे. अनेक माफिया हा धंदा चालवितात आणि त्यातून बक्कळ कमाई करतात. आज आम्ही तुम्हाला अशा ड्रग माफियाबाबत सांगणार आहोत, ज्याने अनेक दशके या जगावर राज्य केले.
2 / 14
हा ड्रग माफिया एवढा क्रूर होता की त्याच्या धंद्याच्या आड आलेल्या 15000 लोकांना त्याने ठार मारले होते. अनेकांना त्याने रातोरात गायब केले होते.
3 / 14
या ड्रग माफियाचे नाव आहे पाब्लो एमिलियो एस्कोबार गैविरिया (Pablo Emilio Escobar Gaviria). लोक त्याला पाब्लो एस्कोबार नावाने ओळखत होते. सारे जग त्याला किंग ऑफ कोकेन (King Of Cocaine) नावानेही ओळखत होते. या पाब्लोकडे जगभराचा पैसा होता. दुसरे तस्करही त्याला रॉयल्टी म्हणून पैसे देत होते.
4 / 14
या पाब्लोने वाटेत आडव्या आलेल्या लोकांचा काटा काढण्यासाठी तब्बल 16 अब्ज रुपये त्या काळात खर्च केले होते. त्याच्या पत्नीनेच हा खळबळजनक खुलासा एका मुलाखतीमध्ये केला होता.
5 / 14
पाब्लोला खूप कमी आयुष्य मिळाले. म्हणजे त्याला 44 वर्षांचा असताना 2 डिसेंबर 1993 मध्येच मारण्यात आले. मात्र त्याआधी त्याने पोलीस आणि सैन्यालाही खूप दमविले होते. मोठी दहशत माजविली होती. कार बॉम्बने उडविणे किंवा एखाद्या मोठ्या नेत्याला ठार मारणे त्याच्यासाठी रोजचेच झाले होते.
6 / 14
पाब्लो एवढा क्रूर होता की त्याने प्रवाशांनी भरलेले अख्खे विमान उडविले होते. त्याला कोलंबियाचा राष्ट्रपती बनायचे होते. मात्र, अवघ्या जगातील कोकेनचा राजा बनलेल्या पाब्लोला हे स्वप्न काही पूर्ण करता आले नाही.
7 / 14
पाब्लो हा 1970 च्या दशकात कोकेनच्या अवैध धंद्यामध्ये आला होता. तेव्हा त्याने अन्य माफियांना एकत्र करून मोठी गँगच तयार केली होती. पाब्लो एवढा ताकदवर बनला होता की त्याने सरकारवर दबाव टाकून त्याच्यासाठी खास तुरुंग स्वत:च तयार केला होता.
8 / 14
त्याने एकच अट ठेवलेली तुरुंगापासून काही किमी अंतरावर पोलीस येऊ शकत नाही. ती सरकारने मान्यही केली होती. असे सांगतात की पाब्लोचा मियामी बीचवर 6500 स्केअर फूटांचा अलिशान बंगला होता.
9 / 14
अमेरिकी एजंट मर्फीने मुलाखतीमध्ये सांगितले की, ते जेल कमी आणि क्लब जास्त होता. जर तो तिथेच राहून आपले पैसे मोजत राहिला असता तर आणखी जगू शकला असता. मर्फीने पाब्लोवर नार्को नावाची टिव्ही सिरीज काढली होती. या सिरिअलमध्ये दाखविण्यात आलेल्या हिंसेपेक्षा प्रत्यक्षातील हिंसा खूपच भयानक होती.
10 / 14
पाब्लोची 800 हून अधिक घरे होती. त्याने कॅरेबिअन समुद्रातील आयला ग्रांडे नावाचे बेटच खरेदी केले होते. ते तेथील 27 बेटांपेक्षा मोठे होते. कार्टाजेनापासून ते 35 किमी दूर समुद्रात होते.
11 / 14
अमेरिकेला जाणाऱ्या ड्रग्सपैकी 80 टक्के ड्रग हे पाब्लोचे होते. कोकेनपासून मिळणारा पैसाच एवढा अफाट होता की फोर्ब्सच्या पहिल्या 10 श्रीमंतांच्या यादीत त्याला घेतले होते.
12 / 14
गुन्ह्याच्या दुनियेत पाब्लोला डॉन पाब्लो, सर पॉब्लो, एल पड्रिनो (द गॉडफाडर) आणि एल पैट्रोन (द बॉस) च्या नावानेही ओळखले जात होते.
13 / 14
1993 ला जेव्हा त्याला मारले गेले तेव्हा त्याची संपत्ती मोजण्यात आली. तेव्हा त्याची संपत्ती 30 अब्ज डॉलर्स म्हणजे आजच्या दुनियेत ती 4.31 लाख कोटी होते. त्याच्याकडे एवढ पैसा होता की उंदीर कुरतडयचे, वाळवी लागायची.
14 / 14
त्याच्या मागे मारिया विक्टोरिया हेनाओ, मुलगा सेबास्टियन मारोक्वीन, मुलगी मैनुएला एस्कोबार असा परिवार होता. त्याचा खास हस्तक पोपियेने त्याच्या सांगण्यावरून 300 लोकांची हत्या केली होती. कुऱ्हाडीने तो या लोकांना मारत होता. त्यांचा मृतदेह ट्रकच्या टायरमध्ये भरत होता.
टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसAmericaअमेरिका