शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बिल्डरसोबत वाढली होती मॉडलची जवळीक, तर पत्नीने ५ लाखांची सुपारी देऊन केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 3:30 PM

1 / 8
पटण्यातील मॉडल मोना राय (Model Mona Rai Murder Case) मर्डर केसमध्ये महत्वपूर्ण आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनुसार, एका बिल्डरच्या पत्नीने सुपारी देऊन ३६ वर्षीय मॉडल मोनाची हत्या (Mona Rai Murder) केली होती. मोनावर १२ ऑक्टोबरला अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. ५ दिवसानंतर मोनाने उपचारादरम्यान जीव गमावला. चला जाणून घेऊ या केसबाबत काय खुलासा झाला.
2 / 8
१२ ऑक्टोबरला आपल्या ११ वर्षीय मुलीसोबत घरी परतत असलेल्या ३६ वर्षी मोना रॉयला रात्री साधारण १० वाजता बाइकवरून आलेल्या दोन व्यक्तींनी गोळी मारली होती. या घटनेत सुदैवाने तिच्या मुलीला काहीही झालं नाही.
3 / 8
घटनेनंतर लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ते मोनाला शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण पाच दिवसांच्या उपचारानंतर १७ ऑक्टोबरला मोनाचं निधन झालं.
4 / 8
मोना राय मर्डर केसमध्ये चौकशी दरम्यान बिहार पोलिसांनी जेव्हा कॉल डीटेल्स चेक केले तर राजू नावाच्या बिल्डरचं नाव समोर आलं होतं. सुरूवातीला त्याच्याकडून काही खास पुरावा मिळाला नाही. पण त्याच्या घरात दारू सापडली ज्यामुळे त्याला तुरूंगात पाठवण्यात आलं. कारण बिहारमध्ये दारूबंदी आहे.
5 / 8
या दरम्यान पोलिसांना आणखी एक संशयास्पद मोबाइल नंबर सापडला. चौकशीतून समोर आलं की, हा नंबर भीम यादव नावाच्या एका शूटरचा आहे. पोलिसांनी त्याला अटक केली तर समजलं की, या संपूर्ण प्रकरणामागे बिल्डर राजूच्या पत्नीचा हात आहे.
6 / 8
असं सांगितलं गेलं की, मॉडलची हत्या केली गेली कारण ती बिल्डर राजूच्या बरीच जवळ आली होती. सूत्रांनुसार, बिल्डरने मोनाला एक फ्लॅटही दिला होता. ही बाब राजूच्या पत्नीला सहन झाली नाही. त्यामुळे तिने मोनाची हत्या केली.
7 / 8
सूत्रांनुसार, मॉडल मोना रायच्या हत्येसाठी ५ लाख रूपयांची सुपारी देण्यात आली होती. यासाठी शूटर हायर केले गेले. त्यांनी हे हत्याकांड केलं. पोलिसांना आणखी एका शूटरचा शोध आहे. पोलीस याचाही शोध घेत आहेत की, बिल्डरला या प्लॅनबाबत काही माहीत होतं की, नाही.
8 / 8
मोना एक टिकटॉक स्टार होती आणि तिने काही वर्षापूर्वी मॉडलिंग सुरू केली होती. ती २०२१ मध्ये मिस अॅन्ड मिसेस ग्लोबल बिहार मॉडलिंग स्पर्धेची उपविजेती होती.
टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी