Bride finds first night that groom is impotent case lodged
मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने नणंदेला सांगितलं नपुंसक आहे पती, सासऱ्याने दिली गप्प बसण्याची धमकी By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 5:45 PM1 / 6उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीने पती नपुंसक असल्याचं सांगितलं. ज्यानंतर सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. महिलेने पतीसहीत सासरकडील 8 लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.2 / 6पुवाया भागातील एका तरूणीचं लग्न 5 जूनला सदर बाजार भागातील एका तरूणासोबत झालं होतं. या लग्नात नवरीकडील लोकांनी 10 लाख रूपये हुंडा दिला होता. मधुचंद्राच्या रात्रीच नवरीला समजलं की, तिचा पती नपुंसक आहे. नवरीने हे जेव्हा आपल्या नणंदेला सांगितलं तर सासरच्या लोकांनी नवरीला मारहाण केली.3 / 6महिलेला आरोप आहे की, सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली आणि तिला धमकी दिली की, हे बाहेर कुणाला सांगितलं तर जीवे मारू. त्यामुळे घाबरून ती गप्प राहली. जेव्हा महिला तिच्या घरी आली तेव्हा तिने घरातील लोकांना सगळंकाही सांगितलं. तक्रारीनंतर पोलिसांनी पती, सासरा, नणंद आणि दिरासहीत आठ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.4 / 6याप्रकरणी एसपी ग्रामीण संजीव वाजपेयी म्हणाले की, एका पत्नीने तिच्या पतीवर आरोप लावला की, तिचा पती आणि सासरच्या लोकांनी फसवणूक करून काही गोष्टी लपवून ठेवून लग्न लावून दिलं. तिच्यासोबत मारहाण केली आणि हुंडाही मागितला. याप्रकरण गुन्हा दाखल केला आणि चौकशी सुरू आहे.5 / 6याआधी मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात मधुचंद्रानंतर पती-पत्नीच्या वादाची घटना समोर आली होती. दोघे जवळ आले तेव्हा अचानक नवरदेवाला नवरीच्या पोटावर टाके दिसले. त्याला संशय आला. पण तो काही बोलला नाही. लग्नाच्या काही दिवसांनंतर नवरी माहेरी गेली. अनेक दिवस होऊनही पती तिला घ्यायला गेला नाही.6 / 6दुसरीकडे पत्नीने पती विरोधात हुंड्यासाठी त्रास दिल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान पतीला समजलं की, पत्नीवर लग्नाआधी अशोकनगरच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यासाठी पतीने माहितीच्या अधिकाराचा वापर केला. त्यातून जी माहिती समोर आली ती बघून तो हैराण झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications