शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑनलाइन शोधली होती नवरी, लग्नाच्या सहा महिन्यांनी पत्नीबाबत असं काही समजलं की गेला 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 10:28 AM

1 / 7
असा विचार करा की, एखादी व्यक्ती मॅट्रिमोनी साइटवर आपल्यासाठी एक जोडीदार शोधते, त्यानंतर लग्न होतं आणि एक दिवस समजतं की, त्याची पत्नी सामान्य महिला नसून एक मोठी चोर आहे. तेही छोट्या मोठ्या चोऱ्या नाही तर तिच्यावर हत्या, चोरी आणि 5 हजारांपेक्षा जास्त कारांची स्मगलिंग करण्याच आरोप आहे. यातील अनेक गुन्हे तिने तिच्या पहिल्या पतीसोबत मिळून केले होते. गुजरातच्या पोरबंदरमधून ही घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाने मॅट्रिमोनी साइटवर शोधून एका महिलेसोबत लग्न केलं, पण ती काही सामान्य महिला नाही.
2 / 7
दैनिक भास्करच्या एका रिपोर्टनुसार, पोरबंदरच्या जालाराम कुटीरमध्ये राहणारा विमल करियाची ओळख गुवाहाटीच्या रीता दाससोबत मॅट्रिमोनी साइटवर झाली होती. इथे रीतावर अनेक गुन्हे दाखल होते. रीताने साइटवर ती घटस्फोटीत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर विमल आणि रीता यांचं लग्न ठरलं.
3 / 7
विमलने लग्नाआधी रीताकडे घटस्फोटाचे पुरावे मागितले होते. तेव्हा तिने कारण देत सांगितलं की, तिचं लग्न फार कमी वयात पंचायतमध्ये झालं होतं. त्यामुळे तिच्याकडे काही पुरावा नाही. रीताच्या बोलण्यावर विश्वास करून विमलने अहमदाबादमध्ये रीतासोबत लग्न केलं. रीता लग्नाच्या सहा महिन्यांनंतर हे सांगून घरातून गेली की, तिला आसाममध्ये जमिनीसंबंधी काही काम आहे. पण ती पुन्हा परत आलीच नाही.
4 / 7
विमल करियाने न्यूज9 ला सांगितलं की, जेव्हा ती आसामला गेली तेव्हा काही दिवस ती त्याच्यासोबत फोनवर बोलत होती. पण नंतर तिचा फोन येणं बंद झालं. काही दिवसांनी विमलला एक फोन आला आणि बोलताना त्या व्यक्तीने तो रीताचा वकील असल्याचं सांगितलं.
5 / 7
तो म्हणाला की, रीताला पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तिला जामीन मिळवण्यासाठी 1 लाख रूपये लागणार. हे ऐकून विमलला वाटलं की, जमिनीच्या वादावरून रीता तुरूंगात असेल. त्यामुळे त्याने 1 लाख रूपयांची व्यवस्था केली आणि रीताच्या खात्यात पाठवले. पैसे पाठवल्यानंतर विमल वकिलाला म्हणाला की, कोर्टाचे कागदपत्र पाठवा. वकिलाने विमलला ऑनलाइन सगळी कागदपत्र पाठवली. त्यात त्याला दिसून आलं की, पत्नीचं नाव रीता दासऐवजी रीता चौहान लिहिलं आहे. त्याला हेही दिसलं की, रीताला जमिनीसाठी आणि चोरीच्या केसमध्ये अटक झाली आहे.
6 / 7
विमलने जेव्हा गुगलवर आसामची रीता चौहानबाबत सर्च केलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. रीता केवळ चोरीच करत नव्हती तर ती गुन्ह्याचा प्लान, हत्यारांची तस्करी, दरोडा आणि गेंड्यांची बेकायदेशीर शिकार अशा अनेक गंभीर केसेसमध्ये आरोपी होती. त्याला हेही समजलं की, रीता एका आतंरराष्ट्रीय कार चोराची पत्नी आहे. हे समजल्यावर विमलने रीताच्या नंबरवर अनेकदा फोन केले, पण त्याला काही उत्तर मिळालं नाही.
7 / 7
रीताने दैनिक भास्करसोबत बोलताना हे सांगितलं की, तिचा घटस्फोट न झाल्याचं सांगितलं. सोबतच सांगितलं की, अनिल चौहानसोबत तिचं लग्न 2007 मध्ये झालं होतं आणि कार चोरीची केस 2015 मध्ये दाखल झाली होती. त्यानंतर ती अनिलच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हती. ती असंही म्हणाली की, कार चोरीमध्ये तिचा काही हात नाही. अनिलची पत्नी असल्याने तिला सह-आरोपी बनवण्यात आलं आहे. पण 2015 मध्ये एका बीएमडब्ल्यू कारच्या चोरीसाठी तिला अटक झाली होती.
टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी