शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नरभक्षक शिक्षकाने शरीराचे तुकडे तुकडे करून खाल्ले; डेटिंग पार्टनरला भेटण्यासाठी बोलावलं अन् केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 1:30 PM

1 / 9
या घटनेत एका ४३ वर्षीय विकृत शिक्षकानं ऑनलाईन डेटसाठी पार्टनरला बोलावलं. यानंतर त्याची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे कापून खात हाडं फेकून दिली. ही घटना जर्मनीमध्ये घडली आहे.
2 / 9
नरभक्षक शिक्षकाने स्टीफन नावाच्या एका ४१ वर्षीय पॉवर टेक्नीशियनला आपलं भक्ष्य बनवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकाने पीडित व्यक्तीला भेटण्यासाठी बोलावलं आणि त्याची निर्घृण हत्या केली.
3 / 9
यानंतर मृत शरीराचे मांस खात खाऊन त्या विकृत शिक्षकाने हाडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिली.
4 / 9
हा गुन्हा सिनेमात रंगवलेल्या कथेप्रमाणे आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि मृत व्यक्ती हे समलैंगिक असून हे दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत होते.
5 / 9
या एका खुनाच्या खुनात दोन आरोपी असून १७० सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले आहेत. तर २३० लोकांकडे चौकशी करण्यात आली आहे. काही लोकांना हाडे आढळून आली. तर शरीराच्या इतर अवयवांची हाडं पोलीस श्वानाच्या मदतीने शोधत आहेत.
6 / 9
सापडलेल्या हाडांच्या फॉरेन्सिक तपासणीत ती हाडं स्टीफनची असल्याचे उघड झाले आहे. पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, गुन्ह्यात आरोपीने मास काढून हाडं वेगळी करून टाकल्याच्या पद्धतीवरून आरोपी हा नरभक्षक असल्याचे दिसून येत आहे.
7 / 9
पोलिसांनी जेव्हा आरोपी शिक्षकाची वेब हिस्ट्री तपासली तेव्हा मागील बऱ्याच काळापासून नरभक्षकांबाबतची माहिती सर्च करत असल्याचं उघडकीस आलं आहे.
8 / 9
जो दुसरा आरोपी आहे तो सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याने गोळ्या झाडून स्टीफनची हत्या केली आणि २० सेकंदात तो फरार झाला. आरोपी नरभक्षक शिक्षकाला पोलिसांनी अटक केली, मात्र दुसरा आरोपी फरार आहे.
9 / 9
तसेच आरोपी शिक्षकाने एखादा व्यक्ती सेक्सशिवाय जिवंत राहू शकतो का? असे देखील सर्च केले होते. पोलिसांना आरोपी आणि पीडित व्यक्तीचे ऑनलाईन डेटिंग ॲपवरील मेसेजही आढळून आले आहेत. आरोपी हा केमिस्ट्रीचा शिक्षक आहे. त्याच्या फ्लॅटमधून चाकू जप्त करण्यात आला आहे. यासोबतच आरोपीच्या फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग आणि काही केमिकल देखील आढळले आहेत.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTeacherशिक्षकGermanyजर्मनीDeathमृत्यू