शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हाथरस प्रकरणी सीबीआय अन् नार्को टेस्टची मागणी; आरोपींच्या समर्थनार्थ १२ गावं पुढे सरसावली 

By पूनम अपराज | Published: October 02, 2020 9:38 PM

1 / 7
त्याचवेळी आरोपींच्या बाजूच्या व मृत मुलीच्या बाजूची माणसांची नार्को टेस्ट केली पाहिजे, जेणेकरून वस्तुस्थिती समोर येऊ शकेल आणि निष्पापांना न्याय मिळेल. (pics - Amar Ujala)
2 / 7
हाथरसच्या घटनेसंदर्भात राजकीय पक्षांची सक्रियता वाढली आहे, पीडितेच्या गावात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाआहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांनी या घटनेच्या विरोधात  निषेध प्रदर्शन केल्यानंतर हाथरसात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे
3 / 7
पीडित मृत मुलीच्या गावाला जाणारे सर्व मार्गांवर मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले असून ते गाव छावणीत रूपांतरित झाले आहे.
4 / 7
अलिगढ रेंजचे आयजी पीयूष मोरडिया म्हणतात की, हाथरसात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पीडित मुलीकडे जाणाऱ्या सर्व वाटांना सील ठोकण्यात आले आहे. या घटनेचा होणार निषेध लक्षात घेता पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे.
5 / 7
दुसरीकडे, मुलीसोबत घडलेल्या घटनेविरोधात आता सर्व स्थरातून लोकं एकत्र येऊ लागले आहे. यानंतर परिसरात तणावही वाढला आहे. अधिकाऱ्यांनाही तणावाबाबत माहिती मिळत असून ते सतर्क आहेत. यामुळेच खबरदारी म्हणून या भागात बराच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
6 / 7
चंदपा भागातील एका गावातील मुलीसोबत ही दुर्दैवी घटना घडली, ती मृत मुलगी वाल्मिकी समाजातील होती, तर चार आरोपी ठाकूर समाजातील होते. या घटनेपासून आरोपी म्हणजेच दुसर्‍या पक्षाने स्वत: ला निर्दोष घोषित केले आहे आणि ते एकजूटही होत आहेत. आजूबाजूच्या खेड्यांमध्येही या प्रकारचे पडसाद उमठू लागले आहेत. परिसरातही तणाव वाढत आहे.
7 / 7
मृत मुलीचा भाऊ आणि आईनेच हत्या केल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार राजवीर सिंह पहलवान यांनी केला आहे. ते म्हणतात की, ते चार तरुण निष्पाप आहेत आणि त्यांना अडकविण्यात आले आहे. त्याचबरोबर खासदार राजवीर सिंह दिलेर यांच्याबद्दल ते म्हणाले आहेत की जनता त्यांना धडा शिकवेल.
टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश