बड्या बँक अधिकाऱ्याने घेतली 2026 कोटींची लाच; बंगल्यामध्ये बंडलांच्या थप्प्याच थप्प्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 1:40 PM
1 / 10 जगातील भ्रष्टाचारी देशांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. याच दरम्यान चीनमधून एक हायप्रोफाईल भ्रष्टाचाराची बातमी आली आहे. 2 / 10 बँकेच्या टॉपच्या अधिकाऱ्याने तब्बल 2026 कोटींची लाच घेतली होती. त्या अधिकाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लाचखोर लाई शाओमिन हे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यही होते. 3 / 10 पिपल्स डेलीच्या वृत्तानुसार शाओमिन यांना न्यायालयाने ५ जानेवारीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. शुक्रवारी त्यावर अंमल करण्यात आला. 4 / 10 या ५८ वर्षीय अधिकाऱ्याला फाशी देण्यात आली की कशी शिक्षा देण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. 5 / 10 शाओमिन यांनी गुप्तपणे दुसरा संसार सुरु केला होता. मुळ कुटुंबापासून दूर राहत होते. पहिल्या पत्नीला सोडून ते दुसऱ्य़ा महिलेसोबत गेल्य़ा काही वर्षांपासून राहत होते. त्यांना या महिलेपासून मुलही होते, असाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. 6 / 10 लाई शाओमिन यांनी लाचेच्या स्वरुपात 2026 कोटी रुपये हडप केले होते. ही रक्कम त्यांनी 2008 ते 2018 च्या दरम्यान घेतली आहे. शाओमिन China Huarong Asset Management Co चे अध्यक्षही होते. 5 जानेवारीला तिआनजिनच्या दुय्यम पीपल्स न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. 7 / 10 शाओमिन यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यावर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचा आढावाही घेतला होता. यावर सर्वोच्च न्यायालयही राजी झाले होते. 8 / 10 शाओमिन यांनी समाजाला एवढे मोठे नुकसान पोहोचवले आहे की, ते त्यांच्या चांगल्या कामावरही भारी पडले आहे. यामुळे त्यांची शिक्षा कायम ठेवली गेली. 9 / 10 या आधी त्यांचा एक व्हिडीओदेखील प्रसारित करण्यात आला होता. यामध्ये शाओमिन त्यांनी केलेला गुन्हा कबूल करताना दिसत आहेत. 10 / 10 सरकारी टीव्ही चॅनलने शाओमिन राहत असलेल्या बिजिंगमधील त्यांच्या बंगल्याचा व्हिडीओदेखील दाखविला होता. या बंगल्यामध्ये ठिकठिकाणी पैशांच्या थप्प्या लागलेल्या दिसत होत्या. आणखी वाचा