बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 4:17 PM
1 / 7 बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली असली, तरी खरे सूत्रधार शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येचा रिअल इस्टेट वादाशीही संबंध जोडला जात आहे. 2 / 7 बाबा सिद्दिकींची तीन जणांनी हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. पण, पोलिसांनी धांडोळा घेतल्यानंतर यात आणखी तीन आरोपी सहभागी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. 3 / 7 पोलिसांनी हत्येनंतर ज्या दोन आरोपींना अटक केली, त्यांची नावं गुरमैल बलजीत सिंह (हरयाणा) आणि धर्मराज राजेश कश्यप (उत्तर प्रदेश) अशी आहेत. त्यानंतर या हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आले. 4 / 7 यात सहभागी असलेल्या तिसऱ्या आरोपीचे नाव शिव कुमार गौतम ऊर्फ शिवा (उत्तर प्रदेश) असे आहे. या प्रकरणातील चौथ्या आरोपीचे नाव मोहम्मद झिशान अख्तर आहे. तो पंजाबमधील पटियालाचा आहे. तो ७ जून रोजी पटियाला तुरुंगातून बाहेर आला होता. 5 / 7 झिशान अख्तरने धर्मराज, शिवा आणि गुरमैल यांना हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यात आणखी दोन आरोपींची नावे समोर आली आहेत. हे दोघेही पुण्यात राहायला होते. 6 / 7 पोलिसांनी पुण्यातून प्रवीण लोणकर याला अटक केली. प्रवीण लोणकर हा शुभम लोणकर याचा भाऊ आहे. प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर यांचाही या कटात सहभाग असल्याचा आरोप आहे. शुभम लोणकरने फेसबुक पोस्ट लिहून जबाबदारी घेतली. 7 / 7 बाबा सिद्धिकी यांची हत्या लॉरेन्स बिष्णोई गँगने केल्याचा दावा तिच्याशी संबंधितांनी केला आहे. पण, यात अनेक कंगोरे असल्याची चर्चा आहे. एसआरए प्रोजेक्टमधून बाबा सिद्दिकींची हत्या झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणखी वाचा