Controversy over bullet in dowry groom hostage beaten by people in Amethi
लग्नानंतर लगेच नवरदेवाने मागितली बुलेट, सासरच्या लोकांनी दिलं आयुष्यभर लक्षात राहिल असं 'गिफ्ट' By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 10:16 AM1 / 10उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये हुंड्याचा लालची असलेल्या नवरदेवाला नवरीचे वडील आणि तिच्या घरातील लोकांनी असा काही धडा शिकवला की तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. लग्नादरम्यान नवरदेवाल हुंड्यात बाइकऐवजी बुलेट हवी होती. 2 / 10नवरीकडील लोकांनी या कारणावरून नवरदेवाची चांगली धुलाई तर केलीच सोबतच पोलीस येईपर्यंत त्याला बांधून ठेवलं होतं. आता लग्नात बुलेट मागणाऱ्या नवरदेवाला आणि त्याच्या वडिलांना मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 3 / 10ही घटना अमेठीच्या केसरिया सलीमपुर गावातील आहे. १७ मे रोजी नसीम अहमदच्या मुलीचा निकाह होता. वरात रायबरेली जिल्ह्यातील रोखा गावातून आली होती. नवरदेव मोहम्मद आमिर सजून-धजून स्टेजवर बसला होता आणि निकाहचे रितीरिवाज सुरू झाले होते. 4 / 10मिळालेल्या माहितीनुसार, वरात पोहोचल्यावर नवरीच्या परिवाराकडून त्यांची चांगली सेवा केली गेली. मान सन्मान दिला. आनंदाने निकाह पार पडला. आणि पाहुणे जेवायला बसले. 5 / 10अशातच नवरदेवाने जेवणावेळी सासरच्या लोकांकडे बाइकऐवजी बुलेटची मागणी केली. नवरीच्या वडिलांनी मुलीसाठी बुलेट देण्यासही होकार दिला. बुकींग होताच बुलेट दिली जाईल असे सांगण्यात आले.6 / 10यासाठी नवरीच्या वडिलांनी नवरदेवाला २ लाख रूपयांचा चेकही दिला. पण नवरदेव आणि त्याचे वडील नवरीला बुलेटवरूनच घेऊन जाणार यावर अडून बसले. 7 / 10इतकंच नाही तर नवरीच्या वडिलांनी नवदेवाला दिलेला चेकही मुलाच्या वडिलांनी फाडून फेकला. तसेच नवरीकडच्या लोकांनी घाणेरड्या शिव्याही दिल्या गेल्या. 8 / 10वाद इतका वाढला की, लग्नाच्या दिवशीच वाद घटस्फोटाच्या दारात पोहोचला. ज्यामुळे संतापलेल्या नवरीकडील लोकांनी गावातील लोकांच्या मदतीने नवरदेवाला बांधू धू-धू धुतला. नवरीला हे सगळं समजलं तर तिनेही अशा घरात जाण्यास नकार दिला.9 / 10नवरीकडील लोकांच्या सूचनेनुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नवरदेव आणि त्याच्या वडिलांना अटक केली.10 / 10 या प्रकरणी पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या वडिलांसहीत ७ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. तर नवरदेवानेही मुलीकडच्या लोकांची तक्रार दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications