Corona patient dead gurugram private hospital ruckus doctor run
Patient dead : खळबळजनक! रात्रीच्यावेळी ऑक्सिजन संपल्यानं ८ रुग्णांचा जागीच मृत्यू; नर्ससह डॉक्टरही फरार By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 4:26 PM1 / 7दिल्ली परिसरातील गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात जवळपास ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. सेक्टर ५६ मधील एका खासगी रुग्णालयतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2 / 7जिथं ३० एप्रिल म्हणजेच शुक्रवारी रात्री ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांचा मृत्यू झाल्याचं कळताच डॉक्टरर्स, नर्स आणि मेडिकल स्टाफ फरार झाल्याचं सांगितलं जात आहे. 3 / 7रुग्णालयाच्या बाहेरून एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात रुग्णांचे नातेवाईक रडताना दिसून येत आहे. मृताच्या नातेवाईकांना पोलिसांना अनेकदा विनवण्या केल्या पण तरीही काही उपयोग झाला नाही. त्यांची मदत करण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. 4 / 7आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार जिल्हा प्रशासनानेही या प्रकरणाबाबत अजूनही मौन सोडलेलं नाही. किर्ती रुग्णालयातील मेडीकलमध्ये काम करणारा तरूण मोहन यांन सांगितले की,'' ३० एप्रलिला रात्री उशीरा मी तिथेच उपस्थित होतो. ऑक्सिजिन संपल्यामुळे जवळपास ८ लोकांना जीव गमवावा लागला.''5 / 7या घटनेला ६ दिवस झाल्यानंतरही गुरूग्राम सेक्टर ५६ च्या पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांना संताप अनावर झाला आहे. 6 / 7रुग्णालयात आधीच आठ रुग्णांच्या मृत्यूमुळे नातेवाईकांची अवस्था फारच वाईट झाली आहे. 7 / 7अशा स्थितीत दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येतील वाढीमुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. (Image Credit- Aajtak) आणखी वाचा Subscribe to Notifications