coronavirus : cases will highly raise due to prostitute workers in india pda
Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊननंतर रेड लाईट एरियामध्ये सेक्स वर्कर्सना सूट मिळाली तर... By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 1:50 PM1 / 7लॉकडाऊननंतर रेड लाइट एरियात व्यावसायिक सेक्स वर्कर्सना सूट मिळाली तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात झपाट्याने वाढू शकतो. एका अभ्यासानुसार असा दावा केला गेला आहे की, रेड लाईट एरियात देह व्यापारावर बंदी घातल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव 17 दिवस उशीरा वाढतील. तसेच, अंदाजे नवीन प्रकरणांमध्ये 72 टक्के कमी होतील.2 / 7येल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, भारतात सेक्स वर्कर्ससाठी रेड लाइट एरिया बंद केल्यास कोविड -१९ मधील संभाव्य मृत्यूची संख्या 63 टक्क्यांनी कमी होऊ शकते. लस तयार होईपर्यंत रेड एरियावर बंदी घालावी, असे संशोधकांचे म्हणणे आहे.3 / 7शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, त्यांनी ही आकडेवारी भारत सरकार आणि अनेक राज्यांच्या सरकारांना दिली आहे. रेड लाईट एरियात सेक्स वर्कर्सवर बंदी घातल्यामुळे, केवळ 45 दिवसांत 72 टक्के कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो आणि कोरोनाच्या गंभीर टप्प्यावर पोहोचण्याआधी महामारीला 17 दिवस मागे टाकलं जाऊ शकते.4 / 7असे केल्याने, सरकारला कोरोनाविरूद्ध धोरणे आखण्यास पुरेसा वेळ तर मिळेलच, तसेच घसरणारी अर्थव्यवस्था आणि लोकांच्या आरोग्यासाठीही हे एक चांगले पाऊल असेल.अभ्यासानुसार, लॉकडाउननंतरही रेड लाइट एरियात सेक्स वर्कर्ससाठी बंद ठेवले असेल तर सुरुवातीच्या ६० दिवसांत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संभाव्य मृत्यूंमध्ये ६३% घट होऊ शकते.5 / 7नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) नुसार भारतात सेक्स वर्कर्सची संख्या जवळपास 6,37,500 आहे. रेड लाईटएरियात रोज सुमारे 5 लाख लोक सेक्स वर्कर्सच्या संपर्कात येतात. अशा परिस्थितीत जर शरीराचा व्यापार चालू राहिला तर संसर्ग होण्याचा धोका खूप वेगवान होईल.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, लैंगिक संबंधामुळे सामाजिक अंतर राखणे अशक्य आहे. इतकेच नाही तर नंतर संक्रमित लोक कोट्यवधी लोकांना संक्रमित करतात. त्याचा प्रभाव भारतातील त्या ५ शहरांत होईल जे रेड झोनमध्ये आधीच आहेत.6 / 7मुंबई, दिल्ली, नागपूर, पुणे आणि कोलकातामध्ये कोरोनाच्या केसेस जलद गतीने वाढतील. या शहरांमधील रेड लाइड एरियात नियंत्रण ठेवले गेले तर मुंबईत १२ दिवस, दिल्लीत १७ दिवस, पुण्यात २९ दिवस, नागपुरात ३० दिवस आणि कोलकातामध्ये ३६ दिवस कोरोनाची केसेस मागे राहतील.7 / 7असे केल्याने पहिल्या ४५ दिवसांत, मुंबईत २१%, दिल्लीत ५६%, पुण्यात ३१%, नागपुरात ५६% आणि कोलकातामध्ये ६६% कोरोनाचा प्रादुर्भाव कमी हॊईल. रेड लाइट एरियातील बंदीनंतर, पुढच्या ६० दिवसांत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ६३% कमी होऊ शकते. या व्यतिरिक्त मुंबईत २८%, दिल्लीत ३८%, पुण्यात ४३%, नागपुरात ६१% आणि कोलकातामध्ये ६६% मृत्यूची संख्या कमी होऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications