Coronavirus: The most dangerous virus in mobile; CBI alert across the country pnm
Coronavirus: सावधान! मोबाईलमध्ये येतोय सर्वात धोकादायक व्हायरस; सीबीआयचा देशभरात अलर्ट By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 1:12 PM1 / 12सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन सुविधांचा वापर करत आहे. त्यामुळे घरबसल्या या लोकांना लुटण्यासाठी हॅकर्सने नवा डाव आखला आहे.2 / 12स्मार्टफोन वापरणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता सीबीआयला देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 3 / 12या सतर्कतेमध्ये सीबीआयने राज्य पोलिस आणि कायदेशीर संस्थांना मैलवेयर(वायरस) वर नजर ठेवण्यास सांगितले आहे. हा धोकादायक मैलवेयर स्वतःला कोरोना व्हायरस अपडेट असल्याचं सांगतो.4 / 12मंगळवारी सीबीआयने दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, गुप्तचर यंत्रणेकडून त्यांना काही माहिती प्राप्त झाली आहे. ज्या आधारावर बँकिंग ट्रोजन Cerberus ला अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्हायरसबाबत सीबीआयने माहिती दिली.5 / 12Cerberus कोरोना व्हायरस महामारीचा चुकीचा वापर करुन युजर्सना बनावट संदेश पाठवतो. सध्या कोरोना व्हायरसबाबत लोक जास्तीत जास्त ऑनलाईन माहिती आणि अहवाल वाचवण्यावर भर देत आहे.6 / 12कोरोना व्हायरसबाबत लोकांच्या मनात असलेली भीती आणि उत्सुकता याचा गैरफायदा घेत हॅकर्स युजर्सना टेक्स्ट मेसेजद्वारे एक लिंक पाठवतात. या लिंकवर कोरोना व्हायरसबाबत महत्त्वाची माहिती दिल्याचं आढळतं. 7 / 12हॅकर्सच्या या चालाखीपासून अज्ञान असलेले यूजर्स लिंकवर क्लिक करतात आणि त्यानंतर धोकादायक मैलवेयर फोनमध्ये इंस्टॉल होतो.8 / 12एक्सपर्ट्स आणि ब्लॉगर्स Cerberus ला धोकादायक असल्याचं सांगत युजर्सना यापासून सतर्क होण्याचा इशारा दिला आहे. 9 / 12एकदा मैलवेयर तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल झाला तर मोठ्या प्रमाणात मोबाईलमधील डेटा चोरी होऊ शकतो. 10 / 12अशावेळी युजर्सचा पर्सनल डेटासोबतच दुसरा अतिमहत्त्वाचा डेटाही धोक्यात येऊ शकतो. तज्ज्ञांचा दावा आहे की, हँकर्स यातून चोरी केलेला डेटा सर्व माहिती कोणत्यातरी रिमोट सर्व्हरवर पाठवतात. 11 / 12सीबीआयच्या म्हणण्यानुसार Cerberus युजर्सच्या बँकिंग डिटेल्स सुरक्षेसाठीही मोठा धोका बनला आहे. हा ट्रोजन यूजरच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित जसं डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर, पासवर्ड चोरण्यावर फोकस देतो.12 / 12त्याशिवाय मोठ्या चालाखीनं यूजर्सला आपल्या जाळ्यात ओढून वैयक्तिक माहिती आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन डिटेल्सही ताब्यात घेतो. आणखी वाचा Subscribe to Notifications