Coronavirus:businessman called call girl from Thailand, but she died due to corona
Coronavirus : कोरोनाकाळात मौजमजेसाठी थायलंडहून कॉलगर्ल बोलावली, पण दोन दिवसांतच अशी घटना घडली By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 11:43 PM1 / 5देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यादरम्यान, एका महिलेच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याबाबत वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. थायलंडहून आलेल्या एका महिलेचा लखनौमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. पोलिसांनी या महिलेवर अंत्यसंस्कार केले. मात्र प्राथमिक तपासामध्ये ही महिला कॉलगर्ल होती आणि तिला एका व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून भारतात बोलावले होते, अशी माहिती समोर आली आहे. 2 / 5मिळालेल्या माहितीनुसार सुमारे १० दिवसांपूर्वी एका मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलाने या महिलेला लखनौमध्ये बोलावून घेतले होते. मात्र भारतात आल्यावर दोन दिवसांतच ही महिला आजारी पडली. त्यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता तिथे तिचा मृत्यू झाला. 3 / 5या महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी दिल्लीमधील थायलंडच्या दुतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर दुतावासाकडून एक पत्र आले. महिलेच्या कुटुंबीयांना तिच्या मृत्यूबाबत सांगण्यात आले असून, कुटुंबाने तिच्यावर भारतातच अंत्यसंस्कार करून अस्थि थायलंडमध्ये पाठवण्याची विनंती केल्याचे सांगण्यात आले होते. 4 / 5थायलंडच्या दुतावासाने या महिलेच्या मृत्यू प्रमाणपत्राची मागणीही लखनौच्या प्रशासनाकडे केली आहे. लखनौच्या पोलिसांनी महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि दुतावासाला माहिती दिली, असे विभूती खंड पोलीस ठाण्याचे प्रभारी चंद्र शेखर सिंह यांनी सांगितले. 5 / 5मात्र पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये ही महिला कॉल गर्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यासर्वामागे इंटरनॅशनल सेक्स रॅकेट असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याला कुणीही अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. आता एलआययूचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications