बापरे! खोटं सोन देऊन भामट्यांनी मिळवले करोडो रुपये अन् बँकेतून तब्बल ४१ वेळा घेतलं कर्ज By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2020 2:05 PM
1 / 6 चोरी, खोट्या नोटा देऊन फसवून केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. गुजरातमधील सुरतमध्ये अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्या ठिकाणी खोटं सोनं देऊन ३० भामट्यांनी जवळपास ४१ वेळा लोन घेतले आहे. या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा अधिकारीसुद्धा अवाक् झाले. सूरत क्राईम ब्रांचने या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. 2 / 6 या प्रकरणी सुरत क्राईम ब्रांचने विशाल भरवाड नावाच्या संशयित गुन्हेगाराला अटक केली आहे. या प्रकरणाबाबत अधिक खुलासा करण्यात आला आहे. ICICI बँकच्या मासिक ऑडिटमध्ये जेव्हा ग्राहकाकडून ३ वेगवेगळ्या प्रकारच्या शाखांमधून कर्जाबाबत माहिती मिळाली तेव्हा बँकेने आपल्या पद्धतीने तपासणी करण्यास सुरूवात केली. 3 / 6 बँकेच्या तपासणीदरम्यान दिसून आलं की, विशाल भरवाड नावाच्या माणसाने आपल्या ३० साथिरांसह मिळून १० ऑगस्ट २०२० ते ९ सप्टेंबर २०२० दरम्यान ४१ वेळा खोटं सोनं देऊन २.५५ कोटींचे गोल्ड कर्ज घेतले होते. बँकेच्या जवळपास १० शाखांमधून हे लोन घेतले होते. 4 / 6 सूरत शहरातील मोटा वराछा, उत्राण, योगी चौक, सस्थाना, कतारगाम आणि पीपलोद या परिसरात हा घोटाळा झाला होता. या प्रकरणात महिला आणि पुरूषांनी एकमेकांना बँकेचा रेफ्रेंस देऊन कर्ज घेतले होते. 5 / 6 ऑडिट रिपोर्टमध्ये खुलासा झाल्यानंतर त्यांच्याकडून सिक्योरिटीच्या स्परूपात बँकेला देण्यात आलेल्या सोन्याची तपासणी केली तेव्हा सोनं खोटं असल्याचे दिसून आले. 6 / 6 सूरतच्या क्राईम ब्रांचकडून या प्रकरणी ३० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सूरत क्राइम ब्रांचचे एसीपी आर.आर.सरवैया यांनी सांगितले की, या प्रकरणी जवळपास ७ लोकांना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आणखी वाचा