शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नराधम शिक्षकाला कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा; ५ वीच्या विद्यार्थिनीवर केला होता बलात्कार 

By पूनम अपराज | Published: February 16, 2021 4:31 PM

1 / 7
या प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला दणका देत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मदत करणाऱ्या लिपिक अभिषेकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
2 / 7
पाटण्यात सत्र न्यायालयाने हा महत्वाचा निकाल दिला आहे. तसेच या प्रकरणात कोर्टाने मुख्याध्यापकाला एक लाख रुपये आणि लिपिकाला पन्नास हजार रुपये दंड देखील ठोठावला आहे.
3 / 7
सप्टेंबर २०१८ साली, पाटण्यातील फुलवारीशरीफ परिसरातील मित्र मंडळ कॉलनीत असलेल्या न्यू सेंट्रल पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अरविंद कुमार यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार केला.
4 / 7
धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांना आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याचं समजलं. मुलीच्या पोटात दुखायला लागल्यामुळे तिला डॉक्टरकडे उपचारासाठी नेल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.
5 / 7
त्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेचा पुरावा देखील पोलिसांकडे आहे.
6 / 7
त्याचप्रमाणे पीडित मुलीचा आणि मुख्याध्यापच्या डीएनएची तपासणी केली असता ती तपासणी जुळली आहे.
7 / 7
न्यायालयाच्या आदेशानंतर आता पीडित मुलीचे गर्भपात करण्यात आले आहे. 
टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसTeacherशिक्षकStudentविद्यार्थीSessions Courtसत्र न्यायालयCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप