शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलीने आपल्या आई-वडिलांना काढ्यात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 12:45 PM

1 / 8
एका मुलीने तिच्या आई-वडिलांना झोपेच्या गोळ्या दिल्या. यानंतर तिने आपल्या प्रियकरासह मिळून घरातील लाखो रुपयांची लूट केली. ही घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडली आहे.
2 / 8
दरम्यान, ही बाब उघडकीस आल्यावर सर्वांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण लखनऊच्या पोलीस ठाण्यातील गोसाईगंजमधील आहे.
3 / 8
रसूलपूर गावात राहणारे मनोज कुमार यांनी पोलिसांना घरातून काही अज्ञात व्यक्तींकडून 13 लाख रोख आणि 3 लाख रुपयांचे दागिने लुटल्याची माहिती दिली होती. या माहितीवरुन तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
4 / 8
पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी मुलीला तिच्या प्रियकरासह इतर दोन जणांसह अटक करण्यात आली. त्यांच्याकडील चोरीच्या पैशांसह दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
5 / 8
पोलिसांनी ही संपूर्ण घटना उघडकीस आणल्यानंतर सर्व माहिती समोर आली. डीसीपी दक्षिण ख्याति गर्ग म्हणाल्या, फिर्यादी मनोज कुमारच्या मुलीच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या आईवडिलांच्या वागण्यामुळे खूप नाराज होती आणि तिला घरात एकटेपणा जाणवत होते. या
6 / 8
कारणास्तव तिने त्यांच्यापासून विभक्त होण्याचा विचार केला. तिचा प्रियकर विनयबरोबर घर घेऊन राहण्याची इच्छा होती. कुटुंबीयांनी केलेल्या गैरवर्तनामुळे त्रस्त होऊन तिने प्रियकर विनयला घरात ठेवलेले पैसे आणि दागिने सांगितले.
7 / 8
विनयने शुभम आणि रणजित यांच्यासमवेत झोपेच्या गोळ्या मुलीला उपलब्ध करून दिल्या आणि सांगितले की, आई-वडिलांना रात्री चार-चार गोळ्या द्याव्या लागतील. त्यानंतर मुलीनेही तसे केले.
8 / 8
मुलीने आई-वडिलांना काढ्यात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. त्यानंतर मुलीने आणि तिच्या प्रियकराने घरात ठेवलेली सुमारे 13 लाखांची रोकड घेऊन पळ काढला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सर्वांना अटक केली आहे.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी