Delhi Crime News : Matrimonia site marriage trap 100 women cheated 25 crore foreign racket
अरे देवा! इंजिनिअर-डॉक्टर बनून लग्नाचं देत होते आमिष, १०० महिलांकडून कोट्यावधी रूपये लुटले By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 2:42 PM1 / 7दिल्लीच्या शाहदरा पोलिसांनी एका असा परदेशी नागरिकाला अटक केली, ज्याने लग्नाचं आमिष दाखवत १०० पेक्षा जास्त महिलांकडून २५ कोटी रूपये लुटले. पोलिसांनी मास्टरमाइंडसोबतच त्याला साथ देणाऱ्या आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. तो महिलांना मॅट्रिमोनिअल साइटवरून संपर्क करत होता. 2 / 7आरोपी महिलांसोबत ऑनलाइन मैत्री करायचा आणि वेगवेगळी कारणे देत त्यांच्याकडून पैसे घेत होता. त्यानंतर महिलांसोबत बोलणं बंद करत होता. काही दिवसांपूर्वी शाहदरा जिल्ह्यातील जगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये एका ३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती की, काही दिवसांपूर्वी एका मॅट्रिमोनिअल साइटवर मनमीतसोबत त्याचा संपर्क झाला होता. 3 / 7हळूहळू त्यांच्यात बोलणं सुरू झालं होतं आणि चॅटींगही करू लागले होते. अचानक एक दिवस मनमीत महिलेला म्हणाला की, तो एक समस्येत अडकला आहे. त्याचं बॅंक अकाउंट फ्रीज करण्यात आलं आहे आणि त्याला पैशांची खूप गरज आहे. त्यानंतर महिलेने त्याने सांगितलेल्या बॅंक अकाउंटमध्ये काही पैसे ट्रान्सफऱ केले.4 / 7त्यानंतरही कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या व्यक्तीने महिलेकडून जवळपास १५ लाख रूपये घेतले. इतकंच काय तर महिलेने तिचे सर्व दागिने गहाण ठेवून त्याला पैसे दिले. महिलेने तक्रारीत पोलिसांना सांगितलं की, इतके पैसे दिल्यावर त्या व्यक्तीने तिच्यासोबतच संपर्क तोडला.5 / 7महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून चौकशी सुरू केली. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन परदेशी नागरिक आहेत. तर एक दिल्लीचाच राहणारा आहे. त्याचं काम कॅश आपल्या अकाउंटमध्ये जमा करून कमीशन कापून बाकी पैसे पुढे देणे होतं. आरोपींची नावे लॉरेन्स चिके, औदुंडे ओकुन्डे आणि दीपक आहे.6 / 7महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून चौकशी सुरू केली. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन परदेशी नागरिक आहेत. तर एक दिल्लीचाच राहणारा आहे. त्याचं काम कॅश आपल्या अकाउंटमध्ये जमा करून कमीशन कापून बाकी पैसे पुढे देणे होतं. आरोपींची नावे लॉरेन्स चिके, औदुंडे ओकुन्डे आणि दीपक आहे.7 / 7महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून चौकशी सुरू केली. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन परदेशी नागरिक आहेत. तर एक दिल्लीचाच राहणारा आहे. त्याचं काम कॅश आपल्या अकाउंटमध्ये जमा करून कमीशन कापून बाकी पैसे पुढे देणे होतं. आरोपींची नावे लॉरेन्स चिके, औदुंडे ओकुन्डे आणि दीपक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications