Delhi : Man killed his live in partner to marry his second girlfriend
ज्याच्यासाठी घर सोडून आली त्यानेच दाबला गळा, दुसरीसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या गर्लफ्रेन्डची हत्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 2:54 PM1 / 10लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपल्सही एकमेकांना दगा देण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. दिल्लीच्या राजपूर खुर्दमधून (Delhi Rajpur Khurd murder) अशीच एक घटना समोर आली आहे. दुसऱ्या एका मुलीशी लग्न करण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या (Delhi Live-in partner murdered) केल्याच घटना घडली आहे. पोलिसांनी लगेच तपास करत, आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.2 / 10राजपूर खुर्द गावाजवळ असलेल्या जंगलात एका अज्ञात महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. पोलिसांना गावातील एका व्यक्तीने फोन करून ८ ऑगस्ट रोजी याची माहिती दिली होती. तरूणीचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक पाहणीतून समोर आलं. 3 / 10पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, तो दारू पिण्यासाठी म्हणून जंगलात आला होता. यावेळी त्याला दोन व्यक्ती एका दुचाकीवर या महिलेला जंगलात घेऊन आले आणि त्यांनी तिची हत्या केली. यानंतर माहिती देणारा व्यक्ती घाबरुन घरी पळून गेला. 4 / 10व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यासोबतच या व्यक्तीची आणखी कसून चौकशी केली. तेव्हा त्याने दिलेल्या माहितीमध्ये फरक जाणवला. नंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल चेक केला आणि त्याची पुन्हा चौकशी केली. 5 / 10तेव्हा त्याने सांगितले की. तो मृत तरुणीला ओळखत होता. फतेहपूर बेरी परिसरात राहणारा त्याचा मित्र अनुजची ती लिव्ह इन पार्टनर आहे. अनुजने आपल्या आणखी एका मित्रासोबत मिळून तरुणीची हत्या केल्याचे या व्यक्तीने सांगितले.6 / 10पोलिसांनी लगेच अनुजला आणि त्याचा साथीदार नौशाद यालाही अटक केली. दोघांचीही चौकशी केल्यावर त्यांना त्यांचा गुन्हा मान्य केला. 7 / 10अनुज आणि मृत तरुणीची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. पुढे अनुजने आपला मित्र रमजानच्या मदतीने तरुणीला पळवून नेले होते. त्यानंतर त्यांनी मंदिरातच लग्न उरकून एकत्र राहण्यास सुरुवात केली होती. 8 / 10दरम्यान आरोपी अनुजचे आणखी एका दुसऱ्या मुलीसोबतही संबंध होते. ती मुलगी लग्नासाठी अनुजच्या मागे तगादा लावत होती. इतकंच नाही तर दोन दिवसांपूर्वी अनुज दुसऱ्या मुलीला देखील पळवून घेऊन गेला होता.9 / 10 मात्र तिच्या कुटुंबीयांनी यांना पकडले होते. या मुलीसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या तरुणीला आयुष्यातून बाजूला करणं गरजेचं होतं. त्यामुळे अनुजने नौशाद आणि रमजानसोबत मिळून तिच्या हत्येचा कट रचला.10 / 10ठरल्याप्रमाणे रमजान आधीच जंगलात थांबला होता. अनुज आणि नौशाद या तरुणीला जंगलात घेऊन गेले. या ठिकाणी तिची ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे, तसेच यात वापरण्यात आलेली दुचाकीही जप्त केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications