शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गोव्याचा प्लॅन, कारमध्ये हत्या, फ्रिजमध्ये मृतदेह; बॉयफ्रेंडने 'असा' रचला निक्कीच्या हत्येचा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 10:54 AM

1 / 14
दिल्लीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या साहिल गहलोत आणि निक्कीने एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. दोघांचाही गोव्याला जाण्याचा बेत होता. पण व्हॅलेंटाईन डेच्या 4 दिवस आधी साहिल गहलोतने प्रेयसी निक्की यादवची गळा दाबून हत्या केली आणि घरच्यांच्या संमतीने दुसऱ्या मुलीशी लग्न केले.
2 / 14
साहिल आता तुरुंगात आहे. साहिलने फ्रिजमध्ये ठेवलेला निकीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे. साहिलने निक्कीच्या हत्येचा कसा कट रचला ते जाणून घेऊया... जानेवारी 2018 दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी साहिल दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये पोहोचला होता.
3 / 14
हरियामाच्या झज्जरमध्ये राहणारी निक्कीही डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन मेडिकलच्या तयारीसाठी येथे आली होती. दोघेही एकाच बसने उत्तम नगर येथील आपापल्या कोचिंगला जात असत. तेव्हाच दोघांची मैत्री झाली. हळूहळू साहिल आणि निक्कीच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
4 / 14
एका महिन्यानंतर साहिलने ग्रेटर नोएडा येथील कॉलेजमध्ये डी फार्मामध्ये प्रवेश घेतला. निक्कीनेही याच कॉलेजमधून बीए (इंग्रजी ऑनर्स) मध्ये प्रवेश घेतला. यानंतर दोघेही ग्रेटर नोएडामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित चालले होते.
5 / 14
साहिल आणि निक्की हे दोघेही याच दरम्यान मनाली, ऋषिकेश, हरिद्वार, डेहराडूनसह अनेक ठिकाणी फिरायला गेले. कोरोना लॉकडाऊन दरम्यान दोघेही आपापल्या घरी गेले. मात्र तेथून परतल्यानंतर दोघेही पुन्हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहू लागले. आरोपी साहिलने या संबंधाबाबत घरी काहीही सांगितले नाही.
6 / 14
अशा परिस्थितीत साहिलच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. साहिलने होकार दिला. डिसेंबर 2022 मध्ये साहिलचे लग्न निश्चित झाले, 9 फेब्रुवारीला एंगेजमेंटची तारीख आणि 10 फेब्रुवारीला लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली.
7 / 14
निक्कीला आतापर्यंत साहिलच्या लग्नाबद्दल माहिती नव्हती. पण साहिलच्या लग्नाची माहिती निकीला कळताच ती अस्वस्थ झाली. या प्रकरणावरून निक्की आणि साहिलमध्ये भांडण झाले होते. दोघांनीही लग्नाआधी गोव्याला पळून जाण्याचा प्लॅन केला.
8 / 14
निक्कीने 9 फेब्रुवारीची तिकिटेही बुक केली होती. दोघांनी मिळून आत्महत्येचा कटही रचला होता. पण साहिलने शेवटच्या क्षणी गोव्याला जाण्यास नकार दिला. निकीने साहिलवर गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. 9 फेब्रुवारीला साहिलची एंगेजमेंट झाली.
9 / 14
निकीने त्याला तिच्या फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावले. साहिलने निक्कीला त्याच्या गाडीत बसवले. यानंतर दोघांमध्ये कारमध्ये वाद झाला. निक्की साहिलला सतत दुसऱ्या मुलीशी लग्न करू नकोस असे सांगत होती. ती साहिललाही तिच्यासोबत गोव्याला जायला लावत होती. मात्र साहिलने तिच्यासोबत जाण्यास नकार दिला.
10 / 14
दोघांमध्ये भांडण झाले आणि साहिलने निक्कीला कारमध्येच मारण्याचा निर्णय घेतला. 26 वर्षीय आरोपी साहिल गहलोत याने कश्मीरे गेट ISBT जवळ 22 वर्षीय निक्कीची हत्या केली. साहिलने मोबाईल डेटा केबलने निकीचा गळा दाबला. यानंतर तो निक्कीचा मृतदेह घेऊन मित्राऊ गावातील त्याच्या ढाब्यावर पोहोचला.
11 / 14
बराच वेळ ढाबा बंद होता. अशा परिस्थितीत त्याने ढाब्यात ठेवलेल्या फ्रीजमध्ये निकीचा मृतदेह लपवण्याचा निर्णय घेतला. साहिलने निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला. आश्चर्याची बाब म्हणजे हत्येनंतर साहिलने संध्याकाळी दुसरे आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला.
12 / 14
10 डिसेंबर रोजी घरच्यांच्या इच्छेने त्यांचे लग्न झाले. साहिलने चार दिवस निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता. मात्र व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पोलिसांना याची माहिती मिळाली. मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.
13 / 14
दुसरीकडे, निक्की बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही. तपासात पोलिसांचा संशय साहिलवर पोहोचला. पोलिसांनी त्याचा फोन ट्राय केला असता तो बंद होता. पोलिस साहिलच्या घरी पोहोचले तेव्हा तो तेथेही उपस्थित नव्हता. मात्र, नंतर पोलिसांनी त्याला दिल्लीतील खैर गावातून अटक केली.
14 / 14
चौकशीदरम्यान साहिलने पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने निकीची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये लपवल्याचे सांगितले. पोलिसांनी निकीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी