'Do anything to me, don't kill me'; Helpless rape victim pleads guilty
'माझ्यासोबत काहीही करा, जिवे मारू नका'; असहाय्य बलात्कार पीडितेची नराधमांना विनवणी By पूनम अपराज | Published: February 20, 2021 7:56 PM1 / 10तरुणीची अब्रू लुटताना तिला इतके जखमी केले की पुढचे ६ महिने तिला अंथरुणावरुन हलताही येणार नाही आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. (Photo - Aaj Tak) 2 / 10मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, जवळपास महिनाभरापूर्वी त्यांची मुलगी संध्याकाळी भोपाळ येथील घराजवळ चालत होती. दरम्यान, निर्जन परिसर आणि अंधार पाहून एका मुलाने आपल्या मुलीला रस्त्यावर खाली ढकलले आणि तिच्या मुलीला जबरदस्ती करण्यास सुरुवात केली.3 / 10पीडितेच्या आईने पुढे सांगितले की, नराधम तिच्यावर सतत अत्याचार करत होता आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करीत होता आणि ती आपला जीव वाचविण्याचा पराकोटीचा प्रयत्न करीत होती. (Photo - Aaj Tak) 4 / 10जेव्हा मुलगी मोठ्याने ओरडली तेव्हा रस्त्याने जाणारे लोक तिच्याकडे धावले, त्यानंतर आरोपी पळून गेला. यानंतर त्यांच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. (Photo - Aaj Tak)5 / 10मुलीला इतकी मारहाण करण्यात आली की, तिच्या डोक्यावर, मान आणि पाठीवर जखम झाल्याने तब्बल १० दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर पीडितेला २५ जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले.6 / 10मुलीला इतकी मारहाण करण्यात आली की, तिच्या डोक्यावर, मान आणि पाठीवर जखम झाल्याने तब्बल १० दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर पीडितेला २५ जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले.7 / 10सध्या पीडित मुलगी तिच्या आईच्या देखरेखीखाली घरात अंथरुणावर आहे. मुलीच्या मणक्याचे हाड तुटल्याने एक रॉड बसवण्यात आला आहे आणि रॉड स्क्रूने फिट करण्यात आला आहे. याशिवाय, मुलगी टणक प्लास्टिकचे कवच घालते आहे, जेणेकरून ती शरीराची हालचाल करू शकणार नाही. प्लास्टिक कवच घातले गेले आहे, जेणेकरून रॉड हलू नये आणि मणक्यातील हाडात बसवलेल्या स्क्रूवर परिणाम होणार नाही. (Photo - Aaj Tak) 8 / 10पीडितेची आई म्हणते की, जेव्हा आपल्या मुलीशी बोलली तेव्हा तिने घटनेची माहिती दिली आणि सांगितले की, मुलगा जेव्हा तिला निर्दयपणे मारहाण करत होता, तेव्हा मुलीला क्षणभर वाटले या प्राणघातक घटनेमुळे मृत्यू होईल म्हणून तिने मुलाला सांगितले, तुला जे काही करायचे कर, परंतु मला मारू नको. मुलीने टणक प्लास्टिकचे आवरण घातले आहे. पीडितेची आई सांगते की, आतापर्यंत पोलिसांनी फक्त विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.9 / 10पीडित मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिने मुलीसोबत घडलेल्या दुष्कृत्याबाबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना निवेदनही दिले. 'आज तक' शी बोलताना पीडितेच्या आईने सांगितले की, शुक्रवारी डीआयजी इरशाद वली आणि जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी त्यांची भेट घेतली आहे आणि सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे, परंतु अद्याप मुलीशी आरोपीची ओळख पटवण्यात आलेली नाही.10 / 10जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनीही शुक्रवारी पीडितेची आणि तिच्या आईची भेट घेतली. पीडित मुलीच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या व्यतिरिक्त आतापर्यंत उपचारासाठी खर्च झालेली रक्कम सरकारकडून मंजूर करुन पीडितेच्या आईला उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications