Doctor to lawyer ..; This is the journey of Gunaratna Sadavarten from Nanded to Mumbai
डॉक्टर ते वकील..; नांदेड ते मुंबई असा आहे गुणरत्न सदावर्तेंचा प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 9:45 PM1 / 9१०० कोटी वसुली प्रकरणात जयश्री पाटील यांच्या याचिकेमुळे अनिल देशमुख कोठडीत गेले. रोहित वेमुला आत्महत्येची चौकशी करणारी याचिका सदावर्तेंनी दाखल केली. 2 / 9एसटीचं विलीनीकरण हे स्वप्नं कामगारांना दाखवलं ते गुणरत्न सदावर्तेंनी. एसटी आंदोलनात जय श्रीराम ते जय भीम घोषणा देणारे सदावर्ते आपल्या शब्दफेकीमुळे प्रकाशझोतात आले. पण तुम्हाला माहितीय का की, गुणरत्न सदावर्ते हे दातांचे डॉक्टर आहेत. स्वत: BDS आहेत.3 / 9वैद्यकीय शिक्षण आणि पीएचडी त्यांनी पूर्ण केली. दातांचे डॉक्टर ते निष्णात वकील हा सदावर्तेंचा प्रवास थक्क करणारा आहे. 4 / 9गुणरत्न सदावर्तेंचा प्रवास सुरु होतो नांदेडपासून. सदावर्तेंनी नांदेडच्या गुरुगोविंदसिंह रुग्णालयात वर्षभर डॉक्टर म्हणून नोकरी केली. नांदेडच्या सोमेश कॉलनीतले ते रहिवासी होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण नांदेडमध्ये झालं. सदावर्ते उच्चशिक्षित आहेत. नेहरु इंग्लिश स्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर नांदेडच्या सायन्स कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं5 / 9बीडीएस, एलएलबी आणि एलएलएम हे शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडीही केलीय. सदावर्ते नांदेडहून मुंबईत स्थायिक झाले आणि तिथेच ते वकिली करू लागले. ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. 6 / 9मॅटच्या बार असोसिएशनचे ते दोन वेळा अध्यक्ष राहिलेत. सदावर्ते यांचे वडील निवृत्तीराव उकाजी सदावर्ते हे नगरसेवर होते. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाकडून ते नांदेड महापालिकेवर निवडून गेले होते. मरणोत्तर देहदान करणारे ते राज्यातले पहिले लोकप्रतिनिधी ठरले होते. राजकारणाचा वारसा सदावर्तेंना घरातूनच मिळालाय. 7 / 9अनिल देशमुख १०० कोटी प्रकरणात मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी तक्रार दिली होती आणि हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. मराठा आरक्षणाविरोधात 2014 साली पहिली याचिका दाखल करणाऱ्या डॉ लक्ष्मणराव किसनराव पाटील यांच्या त्या कन्या आहेत, तर अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेंनीही याचिका दाखल केली होती, सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढ दिला होता. मराठा आरक्षणाविरोधात खटला सुरु होता तेव्हा गुणरत्न सदावर्तेंवर हल्लाही झाला होता. 8 / 9वैजनाथ पाटील नावाच्या व्यक्तीनं कोर्टाबाहेर सदावर्तेंवर हल्ला केला होता. त्यानंतर सदावर्तेंना पोलिस संरक्षण पुरवण्यात आलं. ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि ॲड. डॉ. जयश्री पाटील यांना झेन नावाची मुलगी आहे. अवघ्या १० वर्षांची असताना इमारतीला लागलेल्या आगीत तिनं १७ जणांचे प्राण वाचवले होते. या धाडसाबद्दल तिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 9 / 9मराठा आरक्षण, रोहित वेमुला, अनिल देशमुख, एसटी आंदोलन याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस सदावर्तेंनीच लढलीय. डॉक्टरांना काम बंद आंदोलन करू न देण्याचा खटलाही ते लढलेत. प्रशिक्षणानंतरही १५४ पोलिसांना फौजदारपदी नियुक्त न करण्याची केस सदावर्तेंकडेच होती. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू सदावर्तेंनीच उच्च न्यायालयात मांडली. आता सदावर्ते अडचणीत आले असले तरी एक डॉक्टर ते हायप्रोफाईल वकिल हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications