Drugs in Mumbai: How NCB Caught Bollywood Star Son After Finding Drugs On Cruise Ship
Drugs in Mumbai: ‘असा’ जाळ्यात अडकला बॉलिवूड स्टारचा मुलगा; NCB चं प्लॅनिंग यशस्वी ठरलं By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 12:29 PM1 / 10अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी कॉर्डेलिया द इम्प्रेस नावाच्या क्रुझवर छापेमारी करत याठिकाणी सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर कारवाई केली. या पार्टीत जे लोक उपस्थित होते त्यात बॉलिवूडच्या एका सुपरस्टारचा मुलगाही होता. NCB नं पकडलेल्या सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत. 2 / 10ब्लड रिपोर्ट आल्यानंतर रविवारी कुठल्याही क्षणी एनसीबी(NCB) या प्रकरणात अटक कारवाई करेल. या क्रुझवर डीजेही बोलवण्यात आला होता. याठिकाणी मोठी जंगी पार्टी होणार होती. त्यात पूल पार्टीचाही समावेश होता. दिल्लीतील एका कंपनीला क्रुझवरील पार्टीचं आयोजन दिलं होतं. त्यामुळे या आयोजकावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. 3 / 10सुरुवातीला ही क्रुझ २ ते ४ ऑक्टोबरला मुंबई-गोवा बुक केली होती. परंतु NCB च्या सूत्रांनुसार, ही शिप मुंबईहून २ ऑक्टोबरला २ वाजता निघून गोवा जाण्याऐवजी समुद्राची सफर करून पुन्हा ३ ऑक्टोबरला मुंबईला परतणार होती. याबाबत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना टीप मिळाली.4 / 10समीर वानखेडे यांनी चेक केले तेव्हा कळालं की क्रुझची ऑनलाईन तिकिटं जवळपास बुक झाली होती. परंतु काही जागा शिल्लक होत्या. तात्काळ NCB नं जितक्या जागा शिल्लक होत्या तितक्या बुक केल्या आणि काही अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी पोहचले. 5 / 10कोकेन, चरस, एमडी, गांजा आदी मादक पदार्थ अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. एनसीबीची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर मुंबई-गोवा-मुंबई ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते.6 / 10आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. आर्यन खान याचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला असून त्यातून माहिती गोळा केली जात आहे.7 / 10जशी ही क्रुझ प्रवासासाठी मुंबईहून निघाली तेव्हा काही वेळात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली. या क्रुझवर १ हजार प्रवासी होते परंतु आतापर्यंत १२ जणांनाच ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईत रेव्ह पार्टी काही नवीन नाही. 8 / 10मुंबई पोलिसांचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील जेव्हा डीसीपी आणि वेस्टर्न झोनल ऑडिशनल सीपी होते तेव्हा त्यांनी रेव्ह पार्टीवर धाड टाकली होती. या पार्टीत बॉलिवूड विलनचा मुलगाही सापडला होता. तेव्हा त्या विलननं शपथ घेऊन सांगितले की, त्याचा मुलगा ड्रग्स घेत नाही9 / 10मेडिकल रिपोर्टमध्ये बॉलिवूडच्या त्या विलनच्या मुलाला क्लिनचिट मिळाली होती. परंतु विलनच्या मुलीला एनसीबीनं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्स कनेक्शनदौऱ्यान चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं होतं. मागील वर्षी समीर वानखेडे एनसीबीचे झोनल डायरेक्टर बनले आहेत.10 / 10समीर वानखेडे यांनी बॉलिवूडवर फोकस ठेवला आहे. सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, दिपीका पादुकोण, श्रद्धा कपूरपासून अर्जुन रामपाल यांच्यापर्यंत ड्रग्स प्रकरणात चौकशी झाली आहे. सुशांत सिंह गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीलाही पोलिसांनी अटक केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications