शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३ तरुणींच्या अदांनी ५०० जण घायाळ; दर महिन्याला २५ हजार सॅलरी, काय आहे ही भागनड?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 1:25 PM

1 / 10
दिल्ली विद्यापीठात शिक्षणावेळी युवक आणि युवतींमध्ये प्रेम जडलं. त्यानंतर दोघांनी लग्न केले आणि स्वत:ची हनीट्रॅप गँग बनवली. दिल्ली पोलिसांनी सध्या लोकांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यासह ५ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी सायबर गुन्ह्यात जो खुलासा उघड केलाय तो धक्कादायक आहे.
2 / 10
योगेश गौतम आणि त्याची पत्नी सपना राजनगरच्या एक्सटेंशनमध्ये भाड्याच्या खोलीत राहतात. दाम्पत्याशिवाय निकीता, निधी, प्रिया यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या ३ युवती जाळ्यात अडकलेल्या लोकांना अश्लिल व्हिडीओ करत होत्या.
3 / 10
स्क्रिन रेकॉर्डरच्या साहय्याने कॉल रेकॉर्ड करून तिघी समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करायच्या. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी द्यायच्या. आरोपी पती-पत्नीने तिघींना नोकरीवर ठेवलं होतं. दाम्पत्य हनीट्रॅप गँग चालवत होते. त्यासाठी दर महिन्याला तिन्ही युवतींना २५ हजार रुपये सॅलरी दिली जात होती.
4 / 10
सायबर विभागाचे अधिकारी अभय कुमार मिश्र म्हणाले की, ५ वर्षापूर्वी योगेश आणि सपना एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री झाली नंतर प्रेमविवाह केला. पहिल्याच वर्षात दोघांनी शिक्षण सोडून दिलं आणि पैसे कमवायचं खुळ त्यांच्या डोक्यात आलं.
5 / 10
हे दाम्पत्य ३ मुलींच्या मदतीने लोकांना अश्लिल कॉल करून ब्लॅकमेल करत होते. योगेशला सुरुवातीला याबद्दल माहिती नव्हते परंतु सपनाकडे इतके पैसे कुठून येतात हे विचारल्यावर तिने सत्य सांगितले. मोठी रक्कम मिळतेय या लालसेपोटी योगेशही ब्लॅकमेलिंगच्या धंद्यात सहभागी झाला.
6 / 10
गुजरातच्या राजकोट येथे एका कंपनीच्या मालकाने त्याच्या खात्यातून ९० लाख रुपये गायब झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता त्यांना ही रक्कम गाजियाबादच्या बँकेत वळवण्यात आल्याची माहिती मिळाली.
7 / 10
पोलिसांनी अकाऊंटेंटची चौकशी केली असता त्याला हनीट्रॅप गँगने अश्लिल व्हिडीओ कॉल केला होता. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत हनीट्रॅप गँगने त्याला ब्लॅकमेल केले. ३ वर्षात जवळपास त्याने ८० लाख गमावले आहेत. गुजरात पोलिसांनी या माहितीच्या आधारे हनीट्रॅप गँगला जाळ्यात ओढलं.
8 / 10
पोलिसांनी हनीट्रॅप गँग चालवणाऱ्या दाम्प्त्याला पकडलं. दोघांच्या खोलीवर छापेमारी केली तेव्हा ४ मोबाईल, एक चेक, तीन पासबुक, २ पासपोर्ट, ३ एटीएम कार्ड, ३ पॅनकार्ड, ६ वेब कॅमेरे, ३ आधार कार्ड ५, फेस मास्क, २ जोडी पायल, एक ईअर रिंग, अंगठी, ८ हजार रुपये आणि आणखी सामान जप्त केले.
9 / 10
पोलिसांनी या प्रकरणी योगेश आणि सपना यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. गेल्या ३ वर्षात या दाम्पत्याने ३ युवतींना हाताशी धरत तब्बल ५०० जणांची फसवणूक केली आहे. या लोकांकडून कोट्यवधीची वसूली करत दोघं दाम्पत्य मौजमज्जा करत होते.
10 / 10
सध्या पोलीस या घटनेचा आणखी तपास करत कुणाकुणाची फसवणूक झाली आहे अशा लोकांची यादी तयार करत आहे. पैशांसाठी ५०० जणांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ३ युवतींनाही आणि त्यांचा वापर करणाऱ्या दाम्पत्यांची चौकशी करून पोलीस पुरावे जमा करत आहेत.
टॅग्स :honeytrapहनीट्रॅप