शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

झारखंडमध्ये हायप्रोफाईल मर्डर; मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्याच्या आईवडिलांचा गळा चिरला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 1:52 PM

1 / 11
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रधान सचिवांचे सचिव अरविंद कुमार यांच्या आईवडिलांची गळा कापून हत्या करण्यात आली आहे. पलामू जिल्हा मुख्यालयात कुंड मोहल्ला परिसरात दोघांचा मृतदेह वेगवेगळ्या खोलीत आढळला.
2 / 11
या घटनेची माहिती मिळताच पलामू जिल्ह्याचे एसपी चंदन कुमार सिन्हा डॉग स्क्वाड मदतीनं तपास सुरु केला आहे. सुरुवातीच्या तपासात दोघांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होत नाही. ही घटना रात्री घडली की दिवसा यावर स्पष्टता नाही.
3 / 11
पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी सुरु केली असून वृद्ध दाम्पत्याच्या दिनक्रमाची माहिती घेतली जात आहे. तपासाच्या दृष्टीने घटनास्थळी पोलिसांनी कुणालाही जाण्यास मनाई केली आहे. रांचीहून तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहचली आहे.
4 / 11
पलामूचे एसपी चंदन सिन्हा यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी कुंड मोहल्ला परिसरात एका वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याची माहिती मिळाली. तपासादरम्यान वृद्धाचा मृतदेह रुमच्या बाहेर पडलेल्या अवस्थेत आढळला.
5 / 11
वृद्ध महिलेचा मृतदेह किचनमध्ये पडला होता. दोघांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांचा मृतदेह धारदार शस्त्राने वार करून करण्यात आली होती.एसपीने सांगितले की, घरात हत्या करण्याच्या उद्देशाने हल्लोखर घुसले होते असं घटनास्थळाचा आढावा घेतल्यावर लक्षात येते. परंतु रुममधील कपाट तोडलं होतं. वृद्ध दाम्पत्यावर खूप वार करण्यात आले होते.
6 / 11
या हायप्रोफाईल हत्येची खूप सखोल चौकशी करण्यात येत आहे. एसपी चंदन कुमार सिन्हा यांच्या नेतृत्वात त्याचा तपास सुरू आहे. एक्सपर्ट टीम रांचीहून परतली आहे. घटनास्थळी सर्व पुरावे गोळा केल्यानंतर सीट हटवण्यात येईल.
7 / 11
मृत वृद्धाचं नाव राजेश्वर सिंह चंद्रवंशी असून त्यांच्या पत्नीचं नाव शर्मिला देवी असं आहे. राजेश्वर सिंह चंद्रवंशी निवृत्त फौजी आहेत. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
8 / 11
राष्ट्रीय जनता दलासोबत ते अनेक वर्षापासून कार्यरत होते. निवृत्त फौजी राजेश्वर सिंह कोणत्याही विषयावर अगदी सहजपणे भाष्य करत होते.
9 / 11
राष्ट्रीय जनता दलासोबत ते अनेक वर्षापासून कार्यरत होते. निवृत्त फौजी राजेश्वर सिंह कोणत्याही विषयावर अगदी सहजपणे भाष्य करत होते.
10 / 11
राजेश्वर सिंह चंद्रवंशी यांचा लहान मुलगा अरविंद कुमार चंद्रवंशी झारखंडच्या मुख्यमंत्री सचिवालयात कार्यरत होते. अरविंद कुमार मुख्यमंत्र्यांचे आप्तसचिव होते. राजेश्वर सिंह यांचा मोठा मुलगा अरुण कुमार पलामू विभागीय आयुक्त कार्यालयात कामाला आहे.
11 / 11
अरुण कुमार यापूर्वी जिल्हा जनसंपर्क कार्यालयात कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच राजेश्वर सिंह चंद्रवंशीचा मोठा मुलगा अरुण कुमारसह कुटुंबातील अन्य सदस्य घटनास्थळी पोहचले. नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.
टॅग्स :PoliceपोलिसJharkhandझारखंड