शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 9:25 AM

1 / 10
झारखंडमध्ये ईडीने मोठ्या प्रमाणात कारवाई करत रोकड जप्त केली आहे. ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचा खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी ईडीनं कारवाई केली. त्यात ही रोकड जप्त करण्यात आली आहे. ईडीने रांची येथील विविध ठिकाणांवर धाडी टाकल्या. त्यात हे पैसे जप्त केलेत.
2 / 10
ईडीने झारखंडमधील काही योजनांमध्ये झालेल्या अनियमिततेचा तपास करत मनी लॉन्ड्रिंगमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंते वीरेंद्र के राम यांना अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी झारखंडच्या प्रचारसभेत भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला होता.
3 / 10
त्यानंतर ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांच्याशी निगडीत एका नोकराच्या घरी ईडीने धाड टाकली. त्यात नोटांचा डोंगर जप्त केला. ही रक्कम कोट्यवधीच्या घरात आहे. नोटा मोजण्यासाठी बँक कर्मचारी आणि मशिन मागवण्यात आल्या असून ऐन निवडणुकीत सापडलेल्या या कोट्यवधीच्या रक्कमेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
4 / 10
आलमगीर आलम हे पाकुड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ४ वेळा आमदार राहिलेले आहेत. सध्याच्या राज्य सरकारमध्ये त्यांच्याकडे संसदीय कार्यमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. याआधी आलमगीर २० ऑक्टोबर २००६ ते १२ डिसेंबर २००९ या काळात झारखंड विधानसभेचे अध्यक्ष होते.
5 / 10
आलमगीर आलम यांनी ग्रामपंचायत निवडणुकीपासून राजकीय राजकारणाला सुरुवात केली. २००० मध्ये ते पहिल्यांदा झारखंड विधानसभेत निवडून आले. त्यानंतर आतापर्यंत ते जवळपास ४ वेळा आमदार राहिले आहेत.
6 / 10
मागील फेब्रुवारी महिन्यात ग्राम विकास खात्यातील अधिकारी वीरेंद्र राम यांना तपास यंत्रणांनी अटक केली. ईडीने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी रांची, जमशेदपूर, झारखंड, बिहार आणि दिल्ली याठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं होते. त्यानंतर वीरेंद्र राम याला अटक केली.
7 / 10
तपास यंत्रणांनी तेव्हा काही लग्झरी वाहने, एसयूवी कार जप्त केली होती. आता पुन्हा एकदा ईडीच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने आगामी काळात या प्रकरणी आणखी काही लोकांना अटक केली जाऊ शकते असं बोललं जात आहे.
8 / 10
सोमवारी ईडीच्या पथकाने रांचीसह अन्य ठिकाणी धाडी टाकल्या. त्यात मंत्री आलमगीर आलमचे खासगी सचिव असलेले संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर यांच्या घरी शोध घेतला. त्यावेळी नोकराच्या घरी सापडलेली रक्कम पाहून अधिकारी अवाक् झाले.
9 / 10
जहांगीर याच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात कॅश सापडली, ती पाहून सगळेच अधिकारी, कर्मचारी हैराण झाले. जप्त केलेली रक्कम ही जवळपास २५-३० कोटीहून अधिक असू शकते असा अंदाज ईडीने व्यक्त केला आहे.
10 / 10
काही महिन्यांपूर्वीच झारखंडमध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि व्यावसायिक धीरज साहू यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकून ३५० कोटीहून अधिक रक्कम जप्त केले होते.
टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJharkhandझारखंडjharkhand lok sabha election 2024झारखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४