शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रेम, कुटुंब अन् मर्डर.! तिनदा DNA चाचणी केल्यानंतर समोर आली थरकाप उडवणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 5:55 PM

1 / 10
सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी एका मुलीचा सांगाडा शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला होता. यावेळी मुलीच्या पालकांनी पोलिस ठाण्यापासून न्यायालयात धाव घेतली. आपल्या मुलीचा सांगाडा तरी अंतिम संस्कारासाठी द्यावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हे होऊ शकले नाही. त्यानंतर दोन वर्षांनी डीएनए चाचणी करण्याची कल्पना कुणालातरी सुचली. पण यानंतर या कहाणीत अधिकच गुंतागुंत होत गेली.
2 / 10
इटावा येथील सरकारी रुग्णालयाच्या शवपेटीत एक मृतदेह ४० महिने पडून होता. हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कुटुंबीय पोलीस ठाणे आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवत राहिले, मात् मृतदेह मिळाला नाही. शिवाय या ४० महिन्यांत दोनदा त्या मृतदेहाची डीएनए तपासणी करण्यात आली, पण दोन्ही वेळा अहवाल असा आला की मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही
3 / 10
मात्र ४० महिन्यांनी अचानक एकेदिवशी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले. त्यात हा मृतदेह कुणाचा होता?, या हल्लेखोरांना माफ केले का? परंतु या मृतदेहाची मर्डर मिस्ट्री ऐकली तर कुणीही हैराण होईल.
4 / 10
इटावाच्या सलेमपूर भागातील १९ वर्षीय मुलगी रिता अचानक तिच्या घरातून गायब झाली. रिताला घरच्यांनी तिचा शोध घेतला परंतु ती कुठेही सापडली नाही. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. मात्र काही दिवसांनी गावातील बाहेर एका शेतात सांगाडा आढळला. मृतदेहावर केमिकल टाकून तो जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले. मात्र सांगाड्याजवळ लेडीज चप्पल आणि कपडे पाहून हा मृतदेह रिताचा असल्याचा संशय होता
5 / 10
रिताचे घरचे हा मृतदेह रिताचाच असल्याचा दावा करत होते. परंतु पोलीस त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. सांगाड्याची दोनदा डीएनए चाचणी केली तरीही ते स्पष्ट झाले नाही. त्यामुळे सांगाडा रिताच्या कुटुंबियांना देण्यास नकार दिला. त्यानंतर ३-४ वर्ष हे असेच सुरू राहिले.
6 / 10
रिताच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. याआधी दोन्ही वेळा DNA अहवाल स्पष्ट न झाल्याने आणि सांगाडा अजूनही फ्रीझरमध्येच पडून असल्याने कुटुंबीयांनी पुन्हा एकदा सांगाड्याशी आपला डीएनए जुळवून घेण्याची विनंती केली आणि गरज पडल्यास त्यासाठी लागणारा खर्च उचलण्यास तयार असल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाने कुटुंबीयांची ही तक्रार केवळ गांभीर्याने घेतली नाही तर पोलिसांनी तीन वर्षांहून अधिक काळ फ्रीझरमध्ये सांगाडा कसा ठेवला यावर चिंता व्यक्त केली. जास्तीत जास्त ७२ तास शवागृहात ठेवण्याचा नियम आहे आणि त्यानंतर आवश्यक नमुने सुरक्षित ठेवून अंत्यसंस्कार केले जातात.
7 / 10
जेव्हा न्यायालयाच्या आदेशानुसार इटावा पोलिसांनी तिसऱ्यांदा डीएनए नमुने गोळा केले. यावेळी जेव्हा डीएनए रिपोर्ट समोर आला तेव्हा तीच गोष्ट घडली ज्याचा दावा रिताचे कुटुंब तीन वर्षांहून अधिक काळ करत होते. हा सांगाडा इतर कोणाचा नसून सलेमपूर गावातील रिता या मुलीचा असल्याचे DNA रिपोर्टमधून स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घाईघाईने रिताच्या कुटुंबीयांना बोलावून तीन वर्ष चार महिन्यांनी अचानक सांगाडा त्यांच्या ताब्यात दिलाच, शिवाय गावातील एका शेतात तिच्यावर अंत्यसंस्कारही केले.
8 / 10
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इटावा येथील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय रिताचे तिच्या गावातील रामकुमार यादव नावाच्या व्यक्तीशी संबंध होते. दोघेही फोनवर बराच वेळ एकमेकांशी बोलतच नव्हते तर मधून मधून एकमेकांना भेटायचो. पण अडचण अशी होती की दोघेही वेगवेगळ्या समाजातील होते. रामकुमार विवाहित होता आणि त्याला मुलेही होती. या परिस्थितीत रिता आणि रामकुमार यांच्यातील संबंधांवर दोघांच्याही कुटुंबीयांचा आक्षेप होता.
9 / 10
त्यामुळेच गावाबाहेरील एका शेतात सांगाडा सापडला आणि सांगाड्याजवळ रिताची चप्पल, कपडे सापडले, तेव्हा रिताच्या कुटुंबीयांनी थेट रामकुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले. रामकुमारने त्याच्या कुटुंबीयांसह रिताची हत्या केली असा आरोप रिताच्या कुटुंबीयांनी केला.
10 / 10
यादरम्यान रामकुमारचे संपूर्ण कुटुंब गाव सोडून गेले. पण आता डीएनए अहवालात सांगाडा रिताचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अचानक रामकुमारने न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. दुसरीकडे, तीन वर्षांहून अधिक काळ लोटूनही पोलिसांना अद्यापही रिताचा मोबाईल सापडलेला नाही आणि आता इतक्या वर्षांनंतरही पोलिसांना रिताचा मोबाईल परत मिळण्याची शक्यता कमी आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी