The exploits of two robed brides in the Gwalior city
लग्नाच्या तीन महिन्यानंतर सासरचे १५ लाख लुटून फरार झाल्या दोन सूना, दोन बहिणींकडून दोन भावांची फसवणूक! By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 2:49 PM1 / 9पीडित व्यावसायिकाने सांगितले की, लग्न इंदुर येथील बाबूलाल जैनने जुळवलं होतं आणि त्याने सांगितले होते की, २०१२ मध्ये आलेल्या वादळात नंदनी आणि रिंकीचे आई-वडील वारले होते. आणि परिवार गरीब आहे. त्यामुळे दोन्हीकडील खर्च उचलत त्यांना ७ लाख रूपये दिले होते. 2 / 9पीडित व्यावसायिकांनी पोलिसात दोन्ही सूना, त्यांचे भाऊ संदीप मित्तल, सोयरीक करणाऱ्या व्यक्तीसह सहा लोकांवर एफआयआर दाखल केली आहे. लग्नावेळी सांगण्यात आले होते की, दोघींच्या आई-वडिलांचं निधन झालं आहे.3 / 9लग्न लावण्यासाठी त्यांनी ७ लाख रूपयेही घेतले होते. तपासातून समोर आले की, एका नवरीला आधीच एक मुलगा होता. उज्जैनमध्ये दोघींविरोधात फसवणुकीचा गुन्हा आधीच दाखल आहे.4 / 9बिलौनामध्ये राहणारे नागेंद्र जैन हे कपड्याचे व्यावसायिक आहेत. डिसेंबर २०२० मध्ये त्यांचे लहान भाऊ दीपक जैन आणि सुमित जैन यांचं लग्न उज्जैनच्या नंदनी मित्तल आणि रिंकी मित्तल यांच्यासोबत लावून दिलं होतं. लग्नानंतर नंदनी आणि रिंकी साधारण १५ ते २० दिवस सासरी राहिल्या. नंतर माहेरी गेल्या.5 / 9त्यानंतर त्या ९ जानेवारीला आपल्या कथित भावासोबत म्हणजे संदीप मित्तल आणि आकाश मित्तलसोबत आल्या. काही वेळ सासऱ्यांसोबत बोलली. त्यानंतर सासऱ्यांना हार्ट अटॅक आला. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचा मृत्यू झाला. सासऱ्यांच्या तेरवीनंतर दोघींनी तब्येत बरी नसल्याचं कारण देत घर सोडलं.6 / 9या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा त्या अनेक दिवस झाले तरी परत आल्या नाहीत. त्या नेहमीच येणार येणार असं सांगत राहिल्या. तेव्हा परिवारातील लोकांना संशय आला तेव्हा त्यांनी घरातील कपाट चेक केले. तेव्हा दोघी बहिणी पूर्ण दागिने आणि ७ लाख कॅश घेऊन फरार झाल्याचे समजले. दागिन्यांची किंमत ८ लाख रूपये आहे.7 / 9अनेक बोलवूनही त्या आल्या नाही त्यामुळे त्यांचे सोशल मीडिया अकाउंट चेक केले. तेव्हा समजलं की, दोघी आधीच विवाहित आहेत. नंदनीला एक मुलगा आहे. त्यांचं फेसबुक आयडी नंदनी प्रजापती आणि टीना यादव नावाने आहे. तर रिंकी मित्तलची फेसबुक आयडी रिंकी प्रजापती नावाने आहे.8 / 9संदीप मित्तलची आयडी संदीप वर्मा नावाने आणि वहिणी रीना मित्तलची आयडी रीना चंदेल. तर दुसरा भाऊ आकाश मित्तलची आयडी आकाश मराठा नावाने आहे. समोर आले की, उज्जैनमध्ये दोन्ही नवरींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.9 / 9पीडित व्यावसायिकाने सांगितले की, लग्न इंदुर येथील बाबूलाल जैनने जुळवलं होतं आणि त्याने सांगितले होते की, २०१२ मध्ये आलेल्या वादळात नंदनी आणि रिंकीचे आई-वडील वारले होते. आणि परिवार गरीब आहे. त्यामुळे दोन्हीकडील खर्च उचलत त्यांना ७ लाख रूपये दिले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications